रविंद्र महाजनी यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा गश्मीर टीकेचा धणी झाला. त्यांचा मृत्यू एका छोट्याशा अडगळीच्या खोलीत झाला. मुलगा त्यांच्याकडे लक्ष देत नव्हता यावर गश्मीरने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत एक खुलासा केला आहे. तो म्हणतो की, वडिलांनी मरण स्वीकारलं होतं कारण त्यांना कार्डिअक अरेस्ट होता. डॉक्टरांनी सांगितलं होतं की ते आमच्यासमोर जरी असले तरी तरी कुठल्याही क्षणी ते गेले असते. यातना विरहित मृत्यू यावा तसं त्यांना हे मरण आलं, तो माणूस आयुष्यभर एका राजसारखा जगला. त्यांच्याकडे बँक बॅलन्स होता, ते मोठं घरही घेऊ शकत होते.
जो व्यक्ती वयाची ७५ री ओलांडतो त्याला त्याचं घर साफ करण्यासाठी तेवढ्याच घराची आवश्यकता होती. गेल्या २० ते २२ वर्षात ते दुसऱ्या बाईच्या हातचं जेवत नव्हते. त्यांना स्वतःच काम स्वतः करायला आवडत होतं, जेवण सुद्धा तेच बनवत असत. ते जेव्हा कधी आमच्याकडे राहायला यायचे त्यावेळी त्यांना एक स्वतंत्र रूम असायची त्याची साफसफाई सुद्धा तेच ठेवायचे. वडिलांचं सोबत असणं हेच आमच्यासाठी खूप काही होतं. त्यांनी मागे काहीही केलं असेल, भूतकाळात ते फारसे रमायचे नाही. मागच्या गोष्टीची आठवण काढून त्यांना दुखवण्यात काहीच अर्थ नव्हता. एका बायकोला त्यांचा सहवास मिळतोय बाप म्हणून ते आमच्यासोबत आहेत एवढंच आमच्यासाठी पुरेसं होतं.
तुम्ही काहीही करू नका फक्त आमच्यासोबत राहा एवढीच आमची इच्छा असायची. पण महिन्याभरातच त्यांना काही वाटलं की ते निघून जायचे. माझा पहिला चित्रपट रिलीज होणार होता म्हणून ते बरेच दिवस आमच्यासोबत राहिले. ते स्वछंदी होते, त्यांना केअरटेकर जरी ठेवली तरी ते तिला कामावरून काढून टाकत होते. मी सोशल मीडियाच्या माध्यमातून आव्हान करतो की कोणी जरी त्यांना म्हटलं असत की काका मी तुमची काळजी घेतो, तर त्यांनी लगेचच त्याच्या थोबाडात मारली असती. ते पूर्वीपासूनच तसे होते, त्यांची बहीण कमलिनी फडके या लेखिका आहेत त्या पुण्यात असतात. त्यांचं वय आता ८० वर्ष आहे त्या आता लिहीत नाहीत. तुम्ही त्यांनाही जर विचारलं की रविंद्र महाजनी कसे होते तरी त्या हेच सांगतील.
गेल्या तीन वर्षांपासून त्यांचा आमच्याशी फारसा संवाद होत नव्हता. मी माझ्या मुलाचे फोटो, व्हिडीओ शेअर करू लगलो, तेव्हा ते सतत ते पाहत बसायचे. पण लगेचच त्यांना त्यात अडकुन पडल्याची भीती वाटू लागल्याने त्यांनी माझा नंबरच ब्लॉक करू टाकलं. ते कुठे आहेत काय करतात यावर मी लक्ष ठेवून होतो. त्यांच्या या निर्णयाला आम्ही रिस्पेक्ट देण्याचे ठरवले. तो माणूस शेवटपर्यंत राजा सारखा जीवन जगला.