राज ठाकरे यांची एक मुलाखत सध्या खूप व्हायरल होत आहे. या मुलाखतीत राज ठाकरे यांचे संपूर्ण कुटुंब एकत्रित जमले होते. राज ठाकरे बालपणी कसे होते? याचे अनेक गमतीशीर किस्से त्यांच्या आईंनी इथे शेअर केले. राज ठाकरे यांना शालेय शिक्षणात मुळीच रस नव्हता त्यामुळे ते दहावीच्या परीक्षेत पास होतील ना याची शंका घरातील सर्वानाच होती. दहावीत त्यांना ४२ टक्के मिळाले हे पाहून बाळासाहेब ठाकरे यांनी नवीन टीव्ही खरेदी केला होता. अनेकदा राज ठाकरे बाळासाहेबांसोबत असायचे. शनिवारी शाळा असली तरी ते त्यांना घेऊन जायचे.
एकदा शाळेत असताना मुलांसोबत भांडण झाले म्हणून दुसऱ्या दिवशी शिक्षिकेने शाळा सुटेपर्यंत वर्गाच्या बाहेर उभं केलं होतं. आणि दुसऱ्या दिवशी आईला घेऊन ये म्हणून सांगितलं. तर दुसऱ्या दिवशी बाळासाहेब स्वतः शाळेत हजर झाले. राज ठाकरे यांना शाळेतील शिपायाने मुख्याध्यापकाच्या ऑफिसमध्ये नेले. तेव्हा ज्या शिक्षिकेने त्यांना शिक्षा दिली होती त्या शिक्षिका अक्षरशः रडत रडत डोळे पुसत होत्या. समोर काय घडतंय याचा उलगडा राज ठाकरे यांना खूप उशिरा झाला. असाच एक आणखी मजेशीर किस्सा सांगताना राज ठाकरे म्हणतात की, मी त्या व्यक्तीचं नाव नाही घेत. पण रतन टाटा यांच्यासोबत मी जेव्हा गप्पा मारत होतो, तेव्हा जे आर डी टाटा परदेशात होते. एका मोठ्या उद्योगपतींच्या पत्नीचे त्यावेळी निधन झाले, तेव्हा तिथे जाऊन ये असे त्यांनी सांगितले.
आम्ही तिकडे गेलो तिथे त्या बंगल्याच्या बाहेर बरीच लोकं जमली होती. आतमध्ये गेलो तेव्हा सगळ्यांनी पांढरे कपडे घातलेले होते. ही सगळी लोकं तिथे खाली बसलेली होती. समोरच एक वयस्कर बाई खुर्चीमध्ये बसलेल्या दिसल्या मी तिकडे गेलो. त्यांच्याशी बोललो सॉरी वगैरे म्हटलो. शोक व्यक्त केला आणि जेआरडी टाटांनी मला पाठवलंय असं मी बोललो त्यांना. तिथून बाहेर पडल्यावर मी माझ्याबरोबर असणाऱ्या माणसाला म्हटलं अरे ती बॉडी दिसली नाही कुठे?. तो म्हटला ज्याच्याशी तुम्ही बोललात ती बॉडी होती हां. कारण त्यांच्याकडे असं खुर्चीत बसवतात म्हणे. त्यानंतर ज्या ज्या वेळेला मी असं कोणाच्या घरी गेलोय त्या त्या वेळेला मी पहिल्यांदा कोण खुर्चीत बसलंय का हे बघत असतो. यानंतर मात्र उपस्थितांमध्ये एकच हशा पिकतो.