काल ३ ऑगस्ट रोजी अभिनेत्री रसिका सुनील हिच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या. रसिका सुनील प्रसिद्धीच्या झोतात आली ती माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमुळे. खरं तर या मालिकेत तिने शनयाचे विरिद्धी पात्र साकारले होते, मात्र तरीही हे विरोधी पात्र प्रेक्षकांना विशेष भावले होते. रसिकाने मराठी सृष्टीत येऊन पोश्टर गर्ल, बघतोस काय मुजरा कर, बस स्टॉप, गॅटमॅट सारखे काही मोजकेच चित्रपट केलेले आहेत. पण एक उत्तम गायिका आणि नृत्यांगना अशीही तिने ओळख बनवलेली आहे. डाएट लग्न या नाटकातून ती व्यावसायिक रंगभूमीवर उतरलेली पाहायला मिळते.
मोजक्याच प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी रसिका आपल्या वाढदिवसाच्या दिवशी चक्क मर्सिडीज कार खरेदी करताना दिसली आहे. मराठी सृष्टीत मर्सिडीज खरेदी करणारी ती पहिली मराठी अभिनेत्री ठरली आहे. रसिकाने काल तिच्या वाढदिवसाच्या दिवशी ही कार खरेदी केली होती. त्यावेळी आईबाबा आणि भावासोबत ती हे सेलिब्रेशन साजरं करताना दिसली. रसिकाचा नवरा परदेशात असल्याने तो हा सोहळा साजरा करण्यासाठी उपस्थित राहू शकला नाही. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून रसिकाचे अभिनंदन करणारी कमेंट करून त्याने रसिकाच्या चाहत्यांचे लक्ष्य वेधून घेतले होते. रसिकाने मर्सिडीज GLA ही तब्बल ४९ लाख किंमतीची गाडी खरेदी केलेली आहे. त्यामुळे सर्वात महागडी कार खरेदी करणारी पहिली मराठी अभिनेत्री म्हणून तिला ओळख मिळाली आहे.
मराठी सृष्टीतील काही मोजक्या अभिनेत्यांकडे अशा महागड्या गाड्या आहेत. रसिकाच्या अगोदर स्वप्नील जोशी ,अमेय वाघ, मंदार जाधव तसेच सुभाष यादव या कलाकारांनी तर लाखो करोडो किमतीच्या गाड्या खरेदी करण्याचा मान पटकावला आहे. स्वप्नील जोशी कडे जॅगवार IPace EV400 इलेक्ट्रिक SUV 90 kWh ही गाडी आहे या गाडीची किंमत तब्बल १.१२ कोटी रुपये एवढी आहे. तर अमेय वाघ आणि मंदार जाधव यांनी ४८ लाख किंमतीची मर्सिडीज खरेदी केली आहे. तर अभिनेता सुभाष यादव याच्याकडे मात्र सर्वांपेक्षा महाग गाडी आहे. सुभाषने मर्सिडीज फॉर्मॅटिक टॉप मॉडेल ज्याची किंमत १.५ कोटींच्या घरात आहे. या सर्वांच्या जोडीला आता रसिका सुनील ही देखील महागडी गाडी खरेदी करणारी पहिली अभिनेत्री ठरली आहे.