स्वप्नातलं घर साकार होण्यासाठी अपार मेहनत घ्यावी लागते. अशीच मेहनत घेत मुळशी पॅटर्न फेम पीट्या भाई म्हणजेच रमेश परदेशी यांनी त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरवले आहे. रमेश परदेशी हे अभिनय क्षेत्रात तर आहेच पण त्यांचा कुंभाराचा वडिलोपार्जित व्यवसाय देखील आहे. कशाचीही लाज न बाळगता ते या व्यवसायाला हातभार लावत असतात. आपल्या या प्रवासात त्यांना मित्रांचीही वेळोवेळी साथ मिळाली आहे आणि म्हणूनच या नव्या घरात प्रवेश करत असताना त्यांनी या सर्वांचे आभार मानले आहेत.
हे स्वप्न साकार होताना इथपर्यंतचा जो प्रवास त्यांनी केला त्या प्रवासात बद्दल ते म्हणतात की, “वास्तू नेहमी म्हणते तथास्तू १०२, पौड फाटा, शिलाविहार कॉलनी. जन्म इथला, शाळा,कॉलेज, लग्न सगळचं इथलं, आणि आताचं घर हि सर्वे नं. ४२ प्लॉट नंबर ३२ शिलाविहार कॉलनी, पौड फाटा. बघायला गेलं तर ५० पावलांच अंतर, पण हेचं अंतर पार करण्यासाठी जवळपास २3 वर्षांहून अधिक काळ लागला. सार्वजनिक शौचालय ते हर घर शौचालय असा प्रवास. साधारण २००१च्या सुमारास जागेअभावी व परिस्थिती अभावी कारण १० x १२ ची खोली होती म्हणुन, आधी दत्तवाडी, मग सिंहगड रोड माणिकबाग, मग कोथरुड आझादवाडी मग कर्वे नगर पुणे ५२, ते आता परत कोथरुड, एरंडवणा, पुणे ३८. अशी भ्रमंती करावी लागली, पण काहीही झालं तरी मनात एक स्वप्न घेवूनच बाहेर पडलो होतो.
ते म्हंजे आज नाही तर कधी ना कधी आपला कायमचा शेवटचा पत्ता हा पौड फाटा, शिलाविहार कॉलनी हाच असणारं. खरतर मला ह्या सगळ्याचा सोस नाही. परंतु जी व्यक्ती माझ्याकडे काही नसताना केवळ माझ्यावरच्या प्रेमाखातर हि भटकंती करत राहिली ती खरतर फार सुखवस्तू आणि ह्यापेक्षा चांगलं आयुष्य Deserve करत होती. त्या माझ्या बायकोसाठी “प्रीती”साठी हे स्वप्न माझ्याइतकचं अमूल्य होतं. आणि हिचं माझ्या आईचीपणं सुप्त इच्छा होती, जिने लग्न करून आल्यापासून दादांना, वडिलांना अविश्रांत मेहनत करून साथ दिली. तिचं म्हणणं असायचं की, “पिट्या”, तुझं स्वतःचं घर पौड फाटयावर असलं पाहिजे. आज तिची उणीव खुप जाणवते, ज्या माझ्या आजीने आयुष्यभर मायेचे पांघरूण धरून माझी सगळ्याबाजूंनी जडणघडण केली ती माझी आजी, आई, काकी. ह्या आज हे सुख बघायला हयात नाहित हि खंत मोठी आहे.
तिचं वेदना माझा जवळचा मित्र अमोलच्या बाबतीत जाणवते. माझ्या कोणत्याही छोटया मोठया आनंदाने, achievements नी आनंदी होणारा जिवलग “अमोल धावडे “आज सोबत नाही. हि सल कायम जाणवत राहिलं. ह्या सगळ्या भ्रमंतीत एक दिवस एका बिल्डिंगच्या निळ्या पत्र्याआड मला माझ स्वप्न दिसलं. ते सत्यात उतरेल असा विश्वास वाटला कारण त्या इमारती बाहेरचा बोर्ड ज्यावर लिहिलेलं. “बढेकर डेव्हलपर्स” ह्या नावानं ते स्वप्न अधिकच स्पष्ट आणि गडद झालं. बढेकर ग्रुप्सच्या प्रवीण बढेकरांच्यामुळे. प्रवीण बढेकरांविषयी एक स्वतंत्र पोस्ट लिहिणार आहेच. प्रवीण ह्या नावाचं माझ्या आयुष्यातलं महत्व तुम्हाला माहिती आहेचं. जे स्वप्न बघण्याची हिंमत करु शकणार नाही ते स्वप्न बढेकरांच्या आपलेपणा, सहकार्याने प्रत्यक्षात उतरलं.
व्यवसाय सगळेच करतात, पण व्यवहारापेक्षाही मैत्री, स्नेह जपणारी, नात्याला महत्व देणारी प्रवीण बढेकरांसारखी माणसं दुर्मिळ आहेत. ह्या सगळ्यात अगदी पूर्वनियोजित असल्याप्रमाणे माझा सगळा मिञपरिवार माझ्यासोबत खंबीरपणे उभा राहिला. स्वतः प्रवीण तरडे, मुरली अण्णा, दादा सुतार, अभिजित भोसले, अजय आरेकर, दया, सचिन पाचपुते. स्वप्नाली धावडे ,सागर पाटील, विशाल पाटील, चेतन, आनंद, एक्कया, करण,सागर, गजेंद्र. विनोद, चिंटू सर्व मित्र ह्या सगळ्यांच्या जीवावर हे घराचं स्वप्न पूर्ण झालंय.