Breaking News
Home / मालिका / तू चाल पुढं मालिकेत मयुरी आणि प्रतिकची फुलू लागली लव्ह स्टोरी.. या अभिनेत्याने साकारली भूमिका
pratik mayuri tu chal pudha
pratik mayuri tu chal pudha

तू चाल पुढं मालिकेत मयुरी आणि प्रतिकची फुलू लागली लव्ह स्टोरी.. या अभिनेत्याने साकारली भूमिका

तू चाल पुढं मालिकेत अश्विनीला त्रास देणारी शिल्पी आता एक वेगळा पर्याय निवडत आहे. अश्विनीने मिसेस इंडिया स्पर्धेत सहभागी घेतल्यानंतर तिची लोकप्रियता वाढली आहे. हे पाहून अश्विनीला आणखी कसा त्रास देता येईल याचा ती विचार करते. तेव्हा स्वतःच्याच मुलाचे हाल केल्यावर अश्विनीला देखील त्याचा त्रास होईल म्हणून शिल्पी संजूला शाळेतून परस्पर माहेरी घेऊन येते. संजू कुठेच सापडत नाही या काळजीत विद्युतच्या आईला दम्याचा अटॅक येतो. संजूला शिल्पी घेऊन गेली हे विद्युतला माहीत पडते. यानंतर शिल्पी संजूला खायलाही देत नाही ते पाहून अश्विनी स्वतः संजूसाठी खायला घेऊन येते. मात्र संजूला शिल्पी अश्विनीपासून लांब ओढण्याचा प्रयत्न करते.

pratik mayuri tu chal pudha
pratik mayuri tu chal pudha

मयुरीला मात्र हा सगळा गोंधळ मानसिक त्रास देणारा ठरला आहे. घरातील अडचणी ती प्रतिकसमोर व्यक्त करते. प्रतीक देखील तिची बाजू समजण्याचा प्रयत्न करतो. यातूनच तो मयुरीच्या प्रेमात पडायला लागतो. आता या दोघांची फुलू लागलेली लव्हस्टोरी प्रेक्षकांनाही हवीहवीशी वाटत आहे. मिसेस इंडिया स्पर्धेत प्रतीक अश्विनीला मदत करताना दिसला होता. तिथल्या मॅनेजमेंट टीममध्ये तो हलकी फुलकी कॉमेडी करताना दिसतो. यातूनच त्याची मयुरीशी छान मैत्री जुळून येते, आता प्रतिकला मात्र मयुरी आवडू लागते. प्रतिकची ही भूमिका अभिनेता राज मोरे याने साकारलेली आहे. राज मोरे हा अभिनेता, मॉडेल तसेच युट्युबर आहे. राजला क्रिकेट खेळाची विशेष आवड आहे. वेगवेगळ्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत त्याने सहभाग दर्शवला आहे.

raj deepa more
raj deepa more

झी मराठीवरील मन उडू उडू झालं ही त्याने अभिनित केलेली पहिली मराठी मालिका. या मालिकेत तो एका छोट्याशा भूमिकेत दिसला होता. त्यानंतर झी मराठीच्या तू तेव्हा तशी मालिकेत छोट्याशा भूमिकेत दिसला. तू चाल पुढं मालिकेतून प्रथमच तो एवढ्या मोठ्या भूमिकेत पाहायला मिळाला. मिसेस इंडिया स्पर्धेपासून त्याचा सुरू झालेला हा प्रवास आता थेट मयुरीच्या प्रेमात पडण्यापर्यंत आणि मालिकेचा सहनायक बनण्यापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे मयुरीच्या मनात तो हळूहळू आपली जागा बनवत आहे. सोबतच वाघमारे कुटुंबाचीही मनं जिंकून घेणार का हे पाहावे लागेल. तूर्तास मयुरी आणि प्रतिकच्या प्रेमाची सुरुवात तर झाली आहे. मात्र त्यांच्या प्रेमाला वाघमारे कुटुंब संमती देईल की नाही हे येत्या काही काळात स्पष्ट होईल.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.