Breaking News
Home / जरा हटके / फेब्रुवारी महिन्यात लग्न.. आता गोड बातमी देत अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या पावलांचे होणार आगमन
prasiddhi kishor omkar vartak
prasiddhi kishor omkar vartak

फेब्रुवारी महिन्यात लग्न.. आता गोड बातमी देत अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या पावलांचे होणार आगमन

गेल्या वर्षी अनेक गोड आठवणी सोबत घेऊन आता नविन वर्षात पाऊल टाकत आहे. असे म्हणत मराठी मालिका अभिनेत्रीने लवकरच होणाऱ्या बाळाच्या आगमनाची बातमी दिली आहे. ही अभिनेत्री आहे प्रसिद्धी किशोर. फेब्रुवारी महिन्यात प्रसिद्धीने ओंकार वर्तक सोबत लग्नाची गाठ बांधली होती. लग्नानंतर घर संसारात रमलेल्या प्रसिद्धीच्या घरी आता चिमुकल्या पावलांचे आगमन होत आहे. बेबी शॉवरचे गोड फोटो प्रसिद्धीने शेअर केले असून तिच्यावर आता सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव केलेला पाहायला मिळत आहे.

prasiddhi kishor omkar vartak
prasiddhi kishor omkar vartak

प्रसिद्धी किशोर हीचे पूर्ण नाव आहे प्रसिद्धी किशोर आयलवार. नागपूरच्या सांस्कृतिक वारसा लाभलेल्या आयलवार कुटुंबात तिचा जन्म झाला. प्रसिद्धीचे आजोबा गजानन आयलवार हे संगीत शिक्षक होते. तर काका सुधीर आयलवार हे सांस्कृतिक क्षेत्रात नावलौकिक मिळवलेले कलाकार आहेत. रंगस्वानंद या संस्थेची त्यांनी निर्मिती केली. यातून अनेक नवख्या कलाकारांना त्यांनी घडवलं आहे. प्रसिद्धीला देखील इथूनच अभिनयाचे बाळकडू मिळत गेले. उत्कृष्ट नृत्यांगना शिवाय ललीतकला केंद्र मधून तिने अभिनयाचे धडे गिरवत मराठी सृष्टीत स्वतःची ओळख बनवली. नकुशी या लोकप्रिय मालिकेत प्रसिद्धी प्रमुख भूमिकेत झळकली. लक्ष्मी सदैव मंगलम, आम्ही दोघी, ते दोन दिवस अशा चित्रपट आणि मालिकेमधून प्रसिद्धीला अभिनयाची संधी मिळत गेली.

prasiddhi kishor omkar vartak family
prasiddhi kishor omkar vartak family

प्रसिद्धीने आमच्या हिचं प्रकरण नाटकातून व्यावसायिक रंगभूमीवर देखील पाऊल टाकलं. प्रसिद्धीचे आजोबा संगीत शिक्षक तर तिचे वडील किशोर आयलवार हे देखील नाट्यकर्मी म्हणून ओळखले जातात. साहजिकच कलेचा वारसा जपत तिने देखील अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. मोजक्या चित्रपट, मालिकेतून लोकप्रिय होत असतानाच गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात थाटात लग्न केलेले पाहायला मिळाले. तूर्तास आईपणाचा हा सुखद प्रवास तिला अनुभवायचा आहे आणि म्हणूनच तिने अभिनय क्षेत्रातून काही काळासाठी ब्रेक घेतलेला आहे. लवकरच येणाऱ्या बाळाचे पालकत्व तिला आणि ओंकारला देखील स्वीकारायचे आहे, म्हणूनच बाळाच्या आगमनासाठी ती खूपच उत्सुक आहे. तेवढीच ऊर्जा आणि सकारात्मकता घेऊन मी या नव्या वर्षात पाऊल टाकत आहे असे ती म्हणते.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.