प्राजक्ता माळी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत राहिली आहे. गुरू श्री श्री रविशंकर यांच्या कार्यक्रमाला ती बंगलोरला गेली होती. तिथे तिने हजारोंच्या उपस्थितीत रविशंकर यांना एक प्रश्न विचारला होता. लग्न करणं कंपल्सरी आहे का? या तिच्या प्रश्नावर प्रथम श्री रविशंकर यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली. तू हे कोणाला विचारतीयेस असे म्हणत त्यांनी तिच्या प्रश्नाचे निरसन केले होते. मात्र या प्रश्नावरून प्राजक्ता आता संन्यास घेणार अशी चर्चा सुरू झाली. तीच्या अनेक चाहत्यांनी देखील तू संन्यास घेत आहेस का असा प्रश्न विचारला. या चर्चेवर तिने मौन सोडलेलं पाहायला मिळालं.
नाही नाही, मी संन्यास घेत नाही मी या झगमगत्या दुनियेत खुश आहे असे स्पष्टीकरण तिने दिले होते. प्राजक्ता माळीने मीडियाला एक मुलाखत दिली आहे. मुलाखतीत तीने आपल्या लग्नाबाबत खुलासा केला आहे. २०१८ पासून मी सतत सांगतीये की मी पुढच्या वर्षी लग्न करणार. पण माझे चाहते या निर्णयाच्या मध्ये येतात. ते मला लग्न करू नको असे म्हणतात. चाहत्यांमुळेच मी अजूनही सिंगल आहे असे प्राजक्ता मिश्कीलपणे म्हणते. मात्र एकेकाळी प्राजक्ता वैभव तत्ववादीची खूप मोठी फॅन होती. कॉफी आणि बरंच काही या चित्रपटापासून वैभव तिला आवडू लागला होता. हा माझा पहिला क्रश होता असे प्राजक्ता मुलाखतीतून सांगते. आई हा तुला चालेल का जावई म्हणून, असे चक्क तिने आपल्या आईला सुद्धा विचारले होते.
मुलाखतीत प्राजक्तासोबत अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने सुद्धा अनेक खुलासे केले. प्राजक्ताला मराठी मुलगा नकोय याचा ती खुलासा करताना दिसली. यानंतर प्राजक्ताला साऊथ सुपरस्टार्सची सुद्धा भुरळ पडली आहे. लाईफ पार्टनर म्हणून कोणीही जरी असला तरी त्याला मराठी बनवायचा हे ती मिश्कीलपणे अधोरेखित करते. प्राजक्ताचे अनेक तरुण चाहते आहेत. मात्र प्राजक्ता ही ऋतुजा बागवेची फिमेल क्रश आहे. प्राजक्ता लेसबियन पार्टनर म्हणून चालेल अशीही चर्चा चालू आहे. या अनपेक्षित प्रश्नावर ऋतुजा आणि प्राजक्ता दोघीही खूपच आश्चर्यचकित होतात. ऋतुजा याच वर्षी लग्न करणार आहे असे उत्तर देते, यावर प्राजक्ता तिचे अभिनंदन देखील करते. मात्र प्राजक्ता लग्न करणार का हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.