खानदानातील सगळ्यात मोठं कर्ज घेऊन प्राजक्ता माळीने कर्जतमध्ये स्वतःच फार्महाऊस खरेदी केलं. प्राजक्ता माळीचे हे फार्महाऊस निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं असल्याने मराठी प्रेक्षकांना तिचं मोठं कुतूहल वाटलं होतं. मराठी इंडस्ट्रीत प्राजक्ता अशी एकमेव अभिनेत्री असावी जिने खूप कमी वयातच एवढं मोठं यश मिळवून स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं आहे. एवढ्या कमी वयातच प्राजक्तराज नावाचा दागिन्यांचा व्यवसाय आणि अभिनय क्षेत्रातील तिचा प्रवास उल्लेखनीय ठरला आहे. त्याचमुळे एवढ्या कमी कालावधीतच आलिशान असं फार्महाऊस खरेदी करून तिने सर्वांना आश्चर्याचा एक धक्काच दिला आहे.
प्राजक्ताच्या या फार्महाऊसमध्ये हास्यजत्राच्या कलाकारांनी पार्टी आयोजित केली होती. तर आता तिने हे फार्महाऊस व्यवसायाच्या दृष्टीने पर्यटकांसाठी खुले केले आहे. पण प्राजक्ताला जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा ती या फार्महाऊसमध्ये आपला निवांत क्षण घालवत असते. या फार्महाऊसला तिने प्राजक्तकुंज असे नाव दिले आहे. प्रत्येक चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आणि चित्रपटाच्या शूटनंतर “कुंज” येथे विश्रांतीसाठीचा एक विधी असेल. असे म्हणत तिने हे निवांत क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. नुकताच प्राजक्ताचा प्रमुख भूमिका असलेला तीन अडकून सीताराम हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा आनंद एक आणि फार्महाऊसमध्ये निवांत क्षण घालवनं हा अद्वितीय अनुभव सध्या ती घेत आहे.
प्राजक्ताचं कर्जतमध्ये असलेल्या या फार्महाऊसचा परिसर अतिशय नयनरम्य असा आहे. सभोवताली डोंगर आणि हिरवीगार झाडी यामुळे धकाधकीचे जीवन विसरून ती या फार्महाऊसमध्ये आपला क्वालिटी टाइम एन्जॉय करत आहे. प्राजक्ताच्या या घराची सफर तिने एका व्हिडिओतून करून दिली होती. तीन बेडरूम्स असलेल्या तिच्या या फार्महाऊस मध्ये स्विमिंगपूल देखील आहे. घराला आतून पांढऱ्या आणि चॉकलेटी रंगाचे इंटेरिअर करण्यात आले आहे. आता प्रत्येक चित्रपटाच्या रिलीजनंतर आणि शूटिंगनंतर माझं या फार्महाऊसमध्ये येणं असेल असं म्हणत याचसाठी हे फार्महाऊस मी खरेदी केलंय असे ती म्हणत आहे. फार्महाऊसमधले काही खास फोटो प्राजक्ताने शेअर केले आहेत. तिचा हा क्वालिटी टाइम एन्जॉय करताना पाहून अनेकांनी तिच्या या यशाचं मोठं कौतुक केलेलं आहे.