Breaking News
Home / मराठी तडका / २० वर्षापूर्वी हरवलं अवधूत गुप्तेचं ‘पहिलं प्रेम’.. आजही प्रतीक्षा करतोय
singer avdhoot gupte
singer avdhoot gupte

२० वर्षापूर्वी हरवलं अवधूत गुप्तेचं ‘पहिलं प्रेम’.. आजही प्रतीक्षा करतोय

गायक, अभिनेता, संगीतकार, दिग्दर्शक, निर्माता आणि परीक्षक अशा अनेक भूमिका पडदयावर साकारणारे व्यक्तीमत्व म्हणजे अवधूत गुप्ते. तोडलंस, जिंकलस, भावा, मित्रा हे शब्द रिऍलिटी शोमध्ये गाजवणाऱ्या अवधूतला खरंतर प्रत्येक कलेतला सूर सापडला आहे. पण तरीही अवधूत त्याची हरवलेली एक गोष्ट आजही शोधत आहे. ती गोष्ट कोणती हे जर तुम्ही ऐकले तर, तुम्हालाही असंच वाटेल की ज्याने कुणी अवधूतची ही गोष्ट दिलेली नाही त्याने ती लगेच आणून द्यावी. ती वस्तू अवधूतसाठी फक्त काही कागद नव्हते तर ते त्याचं लेखनावरचं पहिलं प्रेम होतं. माझं हरवलेलं पहिलं प्रेम मी आजही शोधतोय असं अवधूत आजही म्हणतो ते याच कारणासाठी.

singer avdhoot gupte
singer avdhoot gupte

अवधूत २० वर्षापूर्वी दिल्लीत एका गाण्याच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गेला होता. अवधूतच्या वडीलांची जाहिरात कंपनी होती. जाहिरातींची जिंगल्स लिहिणे व ती चालबद्ध करणे हे त्यांचे काम होते. अवधूतला मात्र गायन आवडायचे. अवधूतने छंद म्हणून गाणं म्हणावं पण गाण्यात करिअर करण्याचा विचार करू नये अशी त्याच्या वडीलांची इच्छा होती. पण अवधूतच्या गाण्याला त्याच्या आईचा पाठिंबा होता. मुंबईतील मिठीबाई कॉलेजमध्ये त्या काळात कलेला खूप वाव मिळायचा. त्यातूनच अवधूतने गाण्याच्या स्पर्धा जिंकण्याचा सपाटाच लावला. त्यातूनच अवधूतला गाण्याच्या रिऍलिटी स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली. आईच्या कानावर ही गोष्ट घालून अभ्यासासाठी जातोय असं कारण वडीलांना सांगून अवधूतने दिल्ली गाठली.

avdhoot first love
avdhoot first love

अवधूत सांगतो, त्याकाळात रिऍलिटी शोमध्ये गाण्याच्या स्पर्धेचं शूटिंग एकदाच सलग होत असे आणि शूटिंग पूर्ण झालं की मगच तो शो टिव्हीवर दाखवला जाई. त्यामुळे स्पर्धा संपेपर्यंत माझा हा उद्योग वडिलांना कळणार नव्हता हे नक्की. स्पर्धा हिंदी असल्याने देशभरातून स्पर्धक आले होते. मीही खूप तयारीने उतरलो होतो. आणि त्या स्पर्धेत मी पहिलं बक्षीस मिळवलं. प्रत्येक स्पर्धकासोबत त्यांचे आईबाबा, शिक्षक, गुरू आले होते तर माझ्यासोबत कुणीच नव्हतं. पण त्या स्पर्धेने मला खूप काही शिकवलं. मिळालेली ट्रॉफी घेऊन मी मुंबईच्या ट्रेनमध्ये बसलो आणि तो सगळा अनुभव त्या प्रवासात लिहून काढला. घरी आल्यावर बाबांना सांगण्याचं टेन्शन होतं, काकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मी स्पर्धेतील बक्षीसाविषयी सांगितले.

मी एका स्टुडिओत रेकॉर्डिस्ट म्हणून काम करत होतो. जे अनुभव लेखन मी ट्रेनप्रवासात केलं होतं ते तसच हस्तलिखित स्वरूपात होतं. एकदा  कुणाच्या मध्यस्थीने ते मला आता आठवत नाही, पण एक प्रकाशक महिला माझ्याकडे आल्या आणि काही लेखन आहे का छापायला असे विचारलं. मी ते अनुभव वर्णन त्यांना दिलं, ती ओरिजनल कॉपी होती. पुढे मी खूप दिवस वाट पाहिली पण ना ते लेखन छापून आलं ना माझी ओरिजनल कॉपी मला परत मिळाली. मी फार गांभीर्याने घेतलं नसल्याने त्या बाईंविषयी फार माहिती जाणून घेतली नाही. बर ज्यांच्या मध्यस्थीने त्या बाई आल्या होत्या, त्यांनाही त्यांची प्रेस कुठे आहे ते माहित नव्हतं. एखाद्या रिऍलिटी शोमधलं बक्षीस पाहिलं की मला माझं ते ट्रेनमध्ये लिहिलेलं अनुभवलेखन आठवतं.

अनेक मुलाखतीमध्ये मी हा किस्सा सांगतो आणि सोबतच त्या बाईंपर्यंत ही गोष्ट पोहोचावी म्हणून आवाहनही करतो. पण अजूनतरी मला माझी ती हरवलेली गोष्ट सापडलेली नाहीय. अवधूतच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचे तर त्याने दिग्दर्शित केलेला झेंडा हा सिनेमा खूप गाजला होता. तुझे देखके मेरी मधुबाला या अल्बममुळे अवधूत प्रकाशझोतात आला. ऐका दाजिबा या गाण्याने तर धमाल उडवली. नुकताच प्रदर्शित झालेल्या पांडू या सिनेमाला अवधूतने दिलेले संगीतच नाही तर या सिनेमातील गायलेली गाणीही हिट झाली आहेत. यशाच्या शिखरावर असलेल्या अवधूतची नजर मात्र आजही संघर्षमय दिवसातील त्या पहिल्या वहिल्या लेखनाचा शोध घेत आहे.

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.