आज २६ मे रोजी अभिनेत्री “पल्लवी” वैद्य हिचा वाढदिवस. वाढदिवसानिमित्त तिच्याबद्दल माहीत नसलेल्या खास गोष्टी जाणून घेऊयात…
अभिनेत्री पल्लवी वैद्य हिने स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतून पुतळा मातोश्रींची भूमिका सजग केली होती. प्रत्यक्षात पुतळा मातोश्री अशाच असाव्यात हे त्यांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांना जाणवून दिले होते. पल्लवी वैद्य या पूर्वाश्रमीच्या ‘पल्लवी भावे’. प्रसिद्ध अभिनेत्री पूर्णिमा भावे या पल्लवीच्या थोरल्या भगिनी आहेत हे कित्येकांना माहीत नसावे. होणार सून मी ह्या घरची मालिकेतून पूर्णिमा भावे तळवलकर यांनी बेबी आत्याची भूमिका साकारली होती. याशिवाय दोघी बहिणींनी एकत्रित कामही केले आहे. सह्याद्री वाहिनीवरील ‘दुरावा ‘ या तेरा भागांच्या मालिकेत या दोघी बहिणी झळकल्या आहेत.
अग्गबाई अरेच्चा! हा पल्लवीने अभिनित केलेला पहिला चित्रपट. यात संजय नार्वेकरच्या बहिणीची भूमिका तिने साकारली होती. याच चित्रपटात तिची सह दिग्दर्शक असलेल्या केदार वैद्यशी ओळख झाली पुढे या ओळखीचे प्रेमात आणि नंतर लग्नात रूपांतर झाले. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेचे दिग्दर्शन केदार वैद्य ने केले आहे. याशिवाय आणखी काही मालिका त्याने दिग्दर्शित केल्या आहेत. या सुखांनो या, अधुरी एक कहाणी, कुलवधू, संघर्ष , झाले मोकळे आकाश या आणि अशा कित्येक मालिका चित्रपटातून तिचा प्रवास चालू झाला. करिअरच्या सुरुवातीला साधारण दोन वर्षे तिने नोकरी देखील केली होती मात्र बहिणीप्रमाणे आपण अभिनय क्षेत्रात येऊ याची कल्पना देखील तिने त्यावेळी केली नव्हती. चला हवा येऊ द्या सेलिब्रिटी पॅटर्न मधून तीने प्रेक्षकांना खळखळून हसवले त्यामुळे यातून तिच्या विनोदी अंगाची झलक या मंचावरून पाहायला मिळाली होती. ‘मनमंदिरा: गजर भक्तीचा’ या कार्यक्रमात तिने सूत्रसंचालन केले आहे. तिने साकारलेल्या प्रत्येक भूमिकेतून ती दरवेळी अधिकच खुलत गेलेली पाहायला मिळाली. आज वाढदिवसानिमित्त पल्लवीला खूप खूप शुभेच्छा आणि यापुढेही ती प्रेक्षकांचे असेच मनोरंजन करत राहो हीच एक सदिच्छा…
जर तुम्हाला नवनवीन कलाकारांविषयी जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता तसेच आम्हाला पत्रे देखील लिहू शकता. आमची टीम जास्तीत जास्त मागणी आलेल्या चाहत्यांना प्राधान्य देईल. आमच्याबरोबर जोडलेले रहा आणि आमच्या फेसबुक पेज वर देखील आपल्या आवडत्या नायक नायिकांसाठी लाईक, फॉलो आणि शेअर करा.