पल्लवी पाटील ही मराठी मालिका, चित्रपट अभिनेत्री आहे. संग्राम समेळ सोबत घटस्फोट घेतल्यानंतर पल्लवीने आपल्या नावात बदल केला होता. पल्लवीचं आयुष्य इतरांपेक्षा खूप वेगळं आहे हे तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत उलगडलं आहे. यात तिने आपल्या घटस्फोटाचेही कारण सांगितले. ती म्हणते की, माझं आयुष्य हे इतरांपेक्षा खूप वेगळं आहे, कारण माझे आई वडिल दोघांनाही ऐकू बोलता येत नाही. त्यामुळे मी खूप उशिरापर्यंत बोलत नव्हते. कानावर शब्द पडतील असे घरात काही घडतच नव्हतं. त्यामुळे मी त्यांची मुलगी नाही तर पालकच बनले होते. वडील आई दोघेही असे त्यामुळे घरच्यांकडून त्यांच्या लग्नाला विरोध होता. तेव्हा त्यांनी पळून जाऊन लग्न केले.
वडिलांना ७०० रुपये पगार होता, आपल्या मुलीला बोलता यावं म्हणून त्यांनी घरात टीव्ही घेतला होता. तो बघून माझ्या कानावर शब्द पडू लागले तेव्हा मी बोलायला शिकले. नाटक एकांकिका करायला लागले तेव्हा आईवडिलांना ते नाटक पाहायला बोलवायचे, पण त्यांना त्यातलं काहीच समजत नसल्याने ते नकार द्यायचे. वडिलांनी फक्त समोर बसावं अशी तिची अपेक्षा असायची. काही गोष्टी त्यांना नव्हत्या सांगता येत त्यामुळे अनेकदा अडचणी येत असत. लहान बहीण आणि मी या सगळ्या अडचणींना नेहमी तोंड देत होतो. संग्राम समेळ सोबत घटस्फोट घेण्याचंही कारण तेच होत की मी माझ्या कुटुंबात प्रमुख असल्यासारखी होते. त्यामुळे त्याच्या कुटुंबात गेल्यावर मला ते खूप वेगळं वाटत गेलं. मी इकडे माझ्या आईवडिलांची काळजी घेत होते, पण दुसऱ्या क्षणी तुम्ही त्यांना सोडून नवऱ्याच्या घरी जाता.
पण एका क्षणाला कुठेतरी जाणवलं की आपण या कुटुंबात ऍडजस्ट नाही होऊ शकत. तेव्हा मी गिव्ह अप केलं आणि मी पुन्हा माझ्या आईबाबा सोबत राहायला लागले. दरम्यान मी खूप काही गमावत होते असं मला वाटत होतं म्हणून मी घरी आले. संग्राम दुसरं लग्न करतोय हे मला त्याने सांगितलं होतं, पण केव्हा करतोय हे मला मुळीच माहीत नव्हतं. त्याचदरम्यान मी माझ्या फॅमिलीसोबत फिरायला गेले, त्यावेळी शॉर्टस घालून फोटो टाकले होते. त्यामुळे या फोटोची संग्रामच्या लग्नाबरोबर जोरदार चर्चा झाली. पण मी त्यातला एक फोटो अगोदरच टाकला होता तेव्हा त्याकडे कोणाचेच लक्ष गेले नव्हते. पण घटस्फोटानंतर आपल्याला आयुष्यात काय करायचंय याचे मार्ग चुकतात म्हणून मी कौंसलिंग केलं. ध्यान धारणा केली, थेरपी घेतल्यानंतर माझा नवीन प्रवास सुरु झाला.
२६ जुलै रोजी आलेल्या पुरात आमच्या घरात काहीच शिल्लक नव्हतं. आम्ही कुर्ल्याला राहत होतो त्या दिवशी समोरचं चित्र पाहून आहे ते जगायला शिकलं पाहिजे असा विचार मनात आला. सध्या मी इंडियन टीमची ऑफिशियल इंटरप्रिटर आहे. अग्निहोत्र मालिकेनंतर मी वेगवेगळ्या प्रोजेक्ट मधूनही प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिले. या मुलाखतीच्या माध्यमातून पल्लवीने तिच्या एक्सला एक मेसेज दिला आहे की, तुम्ही माझ्या आयुष्यात आला तो काळ तो क्षण मी खूप छान जगले. परिस्थितीमुळे किंवा त्या सिच्युएशनमुळे किंवा स्वभावामुळे आपलं नाही जमलं. पण मला असं वाटतं की तुम्ही सगळे छान असाल. कधीतरी पुन्हा समोरासमोर भेट झालीच तर हाय हॅलो नक्की बोलू आणि पुढे जाऊ.