Breaking News
Home / जरा हटके / लग्नानंतर बऱ्याच वर्षाने पुण्याला परतली अभिनेत्री.. भाचीला पाहून अश्रू झाले अनावर
neha gadre
neha gadre

लग्नानंतर बऱ्याच वर्षाने पुण्याला परतली अभिनेत्री.. भाचीला पाहून अश्रू झाले अनावर

अभिनय क्षेत्राला रामराम ठोकून अनेक अभिनेत्रींनी लग्नानंतर परदेशात जाणे पसंत केले. यामध्ये माधुरी दीक्षित हिचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. मात्र अभिनयाच्या ओढीने माधुरी पुन्हा कालासृष्टीशी जोडली गेली. मराठी चित्रपटातून लोकप्रिय झालेल्या अश्विनी भावे यादेखील काही वर्षाने पुन्हा कालासृष्टीशी जोडल्या गेल्या. आता मालिका सृष्टीतील काही नायिकांनी आपल्या नवऱ्यासोबत परदेशात संसार थाटला आहे. मृणाल दुसनिस सोबत अभिनेत्री नेहा गद्रे ही देखील मालिका सृष्टिला तात्पुरता रामराम ठोकून नवऱ्यासह परदेशात स्थायिक झाल्या. नेहा गद्रे हिने तर काही दिवसांपूर्वीच परदेशी राहून शिक्षिकेची पदवी मिळवली होती.

neha gadre
neha gadre

मन उधाण वाऱ्याचे मालिकेतून नेहाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. काही मोजक्या मालिका आणि चित्रपटातून तिने प्रमुख भूमिका साकारली होती. दहा वर्षांच्या अभिनय क्षेत्राच्या कारकीर्दीनंतर नेहा विवाहबद्ध झाली. २ मार्च २०१९ रोजी नेहाने ईशान बापट सोबत लग्नाची गाठ बांधली होती. लग्नानंतर नेहा नवऱ्यासोबत ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली. अर्थात यानंतर नेहा अभिनय क्षेत्रातून बाजूला झालेली असली तरी तीने एका वेगळ्या क्षेत्रात करिअर करण्याचे ठरवले. ऑस्ट्रेलियात स्थायिक होऊनही नेहाने आपल्या शिक्षणाकडे लक्ष्य दिले होते. दोन वर्षे तिने अभ्यास आणि मेहनत करून डिप्लोमा इन अर्ली चाईल्डहुड एज्युकेशन अँड केअर ही पदवी मिळवली. पदवी मिळवण्यासाठी मला माझ्या कुटुंबियांची देखील साथ मिळाली असे नेहा आवर्जून म्हणाली होती.

neha gadre return
neha gadre return

नेहा म्हणाली होती की, दोन वर्षांच्या मेहनतीनंतर मी ही पदवी मिळवली आहे, याचा मला आनंद आहे. जवळपास एक दशक मी अभिनेत्री म्हणून काम केलं. त्यानंतर वेगळ्या देशात येऊन नवीन करियर सुरू करणे अजिबात सोपे नव्हते. याबाबत तिने आपल्या कुटुंबियांचे आभार मानले होते. लग्नानंतर नेहा ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले. महामारीचे संकट आणि आपले शिक्षण यामुळे तिला आपल्या आईवडिलांची भेट घेता येत नव्हती. मात्र आता इतक्या वर्षांच्या विरहानंतर नेहा नवऱ्यासोबत मायदेशी परतली आहे. आपल्या आईला, घरच्यांना भेटण्यासाठीची ही ओढ खूप भावनिक होती हे तिने शेअर केलेल्या व्हिडिओतून स्पष्ट दिसत होते. नेहाचे आई वडील पुण्याला असतात. ईथे येऊन नेहाने आपल्या कुटुंबालाची भेट घेतली.

त्यात विशेषतः आपल्या भाचीला इतक्या वर्षानंतर समोर पाहून नेहाला आपले अश्रू अनावर झाले. भाचीची भावुक करणारी भेट नेहाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे. सध्या इंटरनेट मोबाईलमुळे जग खूप जवळ आले आहे. व्हिडिओ फोन कॉल्सच्या माध्यमातून आपण एकमेकांना दिसत असलो तरी, प्रत्यक्षात भेटण्याची मजा त्याचा आनंद काही वेगळाच असतो. त्यामुळे नेहाने शेअर केलेला हा व्हिडीओ तिच्या चाहत्यांना देखील भावुक करून गेला आहे.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.