दाक्षिणात्य सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा आणि विग्नेश शिवन यांचा आज ९ जून २०२२ रोजी मोठ्या थाटात विवाह संपन्न झाला आहे. महाबलीपुरम येथे त्यांच्या लग्नाचा हा सोहळा संपन्न झाला आहे. नयनतारा हिने आपल्या लग्नाचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले पाहायला मिळत आहेत. तिच्या चाहत्यांनी अक्षरशः लाईक्सचा पाऊस पाडलेला पाहायला मिळतो आहे. नयनतारा आणि विग्नेश हे गेल्या ७ वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यामुळे हे दोघे लग्न कधी करणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागून होते. मात्र गेल्या काही दिवसांपासूनच नयनतारा आणि विग्नेश लवकरच लग्न करणार असे बोलले जात होते.
त्यांच्या लग्नाची लगबग सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. आज पार पडलेल्या त्यांच्या या लग्नाला सुपरस्टार रजनीकांत यांनी विशेष उपस्थिती दर्शवलेली पाहायला मिळाली. रजनीकांत यांच्या हाताने विग्नेशला मंगळसूत्र देण्यात आले होते त्यानंतर हे मंगळसूत्र विग्नेशने नयनताराला घातले होते. त्यामुळे रजनीकांत यांची उपस्थिती खूप महत्त्वाची मानली होती. रजनीकांत यांच्यासोबतच दाक्षिणात्य सृष्टीतील अनेक कलाकार, दिग्दर्शक तसेच बॉलिवूड सृष्टीतील कलाकार देखील या लग्नात पाहायला मिळाले. कार्थिक शिवकुमार, सुर्या, तमन्ना, दिव्या दर्शनी, विजय सेथुपती, समंथा रूथ प्रभू, चिरंजीवी, मनी रत्नम, कमल हसन आणि हजेरी लावली.
तसेच बॉलिवूड स्टार शाहरुख खान, जयम रवी, गौतम मेनन, मॉलिवूड ऍक्टर दिलीप आणि निर्माते बोनी कपूर यांनी देखील या लग्नाला हजेरी लावलेली पाहायला मिळाली. या मोठमोठ्या सेलिब्रिटीं सोबत राजकीय नेते मंडळींनी देखील नयनतारा आणि विग्नेशच्या लग्नाला हजेरी लावून त्यांना शुभाशीर्वाद दिलेले पाहायला मिळाले. समंथा काही खास कारणास्तव या लग्नाला हजेरी लावू शकणार नाही असे भाकीत वर्तवले जात होते. मात्र समंथाने या लग्नाला हजेरी लावून हे भाकीत खोटे ठरवले. नयनतारा आणि विग्नेश यांचे लग्न एका खास अर्थाने दाक्षिणात्य सृष्टीत खूप गाजलेले पाहायला मिळाले ते म्हणजे अन्नदानामुळे.
जवळपास १८००० मुलं आणि एक लाख लोकांना या लग्नात अन्नदान करून त्यांनी या चाहत्यांचे शुभाशीर्वाद मिळवले आहेत. आपलं लग्न आठवणीत राहावं या हेतूने त्यांनी हा महत्वाचा निर्णय घेतला होता. लाखो लोकांना अन्नदान करून नयनतारा आणि विग्नेश यांनी चाहत्यांचे आशीर्वाद मिळवले आहेत. विग्नेश शिवन हा साऊथ इंड्रस्टीचा प्रसिद्ध फिल्ममेकर आहे. नयनतारा आणि विग्नेश रिलेशनमध्ये होते त्यावेळी या दोघांनी मिळून एक निर्मिती संस्था उभारली. यातून त्यांनी काही दाक्षिणात्य चित्रपटांची निर्मिती देखील केली आहे.