Breaking News
Home / मराठी तडका / मृणाल कुलकर्णी यांच्या मुलाची एंगेजमेंट.. होणारी सून आहे प्रसिद्ध अभिनेत्री
virajas kulkarni shivani rangole
virajas kulkarni shivani rangole

मृणाल कुलकर्णी यांच्या मुलाची एंगेजमेंट.. होणारी सून आहे प्रसिद्ध अभिनेत्री

अभिनेता विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे यांची नुकतीच एंगेजमेंट पार पडली आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच या दोघांनी गोवा ट्रिप एन्जॉय केली होती. त्यानंतर शिवानीने तिच्या हातातली अंगठी दाखवत एंगेजमेंट झाली असल्याचे कळवले आहे. या फोटोंवर सेलिब्रिटींनी लाईक्सचा पाऊस पाडत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शिवानीने श्रावण क्वीन स्पर्धेत सहभाग दर्शवला होता. इथूनच तिला जास्त प्रसिद्धी मिळाली होती. स्टार प्रवाहवरील सांग तू आहेस का, डॉ बाबासाहेब आंबेडकर या मालिकेत शिवानी रांगोळे मुख्य भूमिका साकारताना दिसली होती.

virajas kulkarni shivani rangole
virajas kulkarni shivani rangole

डॉ बाबासाहेब आंबेडकर या मालिकेत तिने रमाबाईंची व्यक्तिरेखा साकारली होती. तिच्या सहजसुंदर अभिनयाचे तिने हे ऐतिहासिक पात्र सुरेख निभावले होते. याशिवाय आप्पा आणि बाप्पा, आम्ही दोघी, यलो, चिंटू २ या चित्रपटातूनही ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. शिवानीने काही वृत्तपत्रासाठी लेख लिहिले आहेत, हे लेख वृत्त पत्रातून छापून देखील आले आहेत. तर विराजस कुलकर्णीने झी मराठीवरील माझा होशील ना मालिकेतील मुख्य भूमिका साकारली होती. विराजस कुलकर्णी व्हीकटोरिया या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून तो पहिल्यांदाच चित्रपट दिग्दर्शन क्षेत्रात उतरत आहे. याअगोदर थेटरऑन या त्याच्या संस्थेतून त्याने नाटकांचे लेखन, दिग्दर्शन आणि आई मृणालदेव कुलकर्णी यांच्यासोबत चित्रपटाचे सहदिग्दर्शक म्हणून काम केले होते. डावीकडून चौथी बिल्डिंग या नाटकात विराजस आणि शिवानी दोघेही एकत्रित झळकले आहेत.

virajas shivani
virajas shivani

हे दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांचे एकत्रित रील व्हिडीओज असो वा फोटोशूट त्यांच्या सोशल अकाउंटवर ते नेहमीच शेअर करताना दिसतात. त्यामुळे हे दोघे एकमेकांच्या प्रेमात आहेत असे जगजाहीर झाले होते. विराजसची आई अभिनेत्री मृणाल देव कुलकर्णी यांनी आपल्या भावी सुनेबद्दल एक प्रतिक्रिया दिली होती की, आयुष्य त्याचं आहे त्यामुळे मुलगी निवडण्याचा सर्वस्वी हक्क त्याचाच आहे. त्याला साजेशी अशी बायको मिळावी, ती विराजसची मैत्रीण असावी. दोघांनी एकमेकांना समजून घ्यायला हवे, आमच्या घरात तिचे स्वागतच असेल. असे त्या म्हटल्या होत्या. विराजस आणि शिवानी यांची एंगेजमेंट झाल्यानंतर आता हे दोघे लग्न कधी करणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. तूर्तास एंगेजमेंट निमित्त शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णीचे खूप खूप अभिनंदन.

beautiful couple shivani virajas kulkarni
beautiful couple shivani virajas kulkarni

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.