Breaking News
Home / जरा हटके / ही आहे अनिरुद्धची रिअल लाईफ ईशा.. सांगितली हॉस्पिटलमधील सुंदर आठवण
mithila milind gawali
mithila milind gawali

ही आहे अनिरुद्धची रिअल लाईफ ईशा.. सांगितली हॉस्पिटलमधील सुंदर आठवण

आई कुठे काय करते या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारून मिलिंद गवळी यांना प्रेक्षक वर्गाकडून शिव्यांची लाखोली वाहीलेली पाहायला मिळते. अर्थात ही त्यांच्या सजग अभिनयाची पावती असल्याने काही जाणकार प्रेक्षक त्यांच्या या भूमिकेचे कौतुक देखील करताना दिसतात. मालिकेतला अनिरुद्ध सर्वांसमोर चांगला बनून अभिषेकला पुढे करून आपला डाव साध्य करताना दिसत आहे. त्यामुळे हा अनिरुद्ध अरुंधती आणि अशुतोषच्या लग्नाला परवानगी देणार का याची अधिक उत्सुकता आहे. मिलिंद गवळी यांनी मराठी सृष्टीत विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. केवळ मराठीच नव्हे तर मल्याळम तसेच बॉलिवूड सृष्टीतही त्यांनी अभिनय साकारलेला पाहायला मिळतो.

mithila milind gawali
mithila milind gawali

गावरान बाज असलेल्या चित्रपटात मिलिंद गवळी नायकाच्या भूमिकेत दिसले होते या चित्रपटामुळे त्यांना अमाप लोकप्रियता मिळाली. नुकताच त्यांच्या एकुलत्या एक लेकीचा वाढदिवस झाला. वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी आपल्या लाडक्या लेकीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोबतच तिच्या जन्माची एक आठवण देखील सांगितली आहे. मिलिंद गवळी यांच्या लाडक्या लेकीची नाव आहे मिथिला गवळी. चार वर्षांपूर्वी मिथिला दिग्विजय कदम सोबत विवाहबद्ध झाली. डान्स टीचर, फिटनेस ट्रेनर अशी तिची ओळख आहे. घोडेस्वारी मध्ये तिला विशेष आवड आहे.

milind gawali daughter mithila
milind gawali daughter mithila

मिथिलाच्या जन्माची गोष्ट सांगताना मिलिंद म्हणतात की, आज तुझ्या वाढदिवशी मला असं वाटतं की कालच बाबुलनाथ हॉस्पिटलमध्ये आलो होतो. तुझ्या जन्माच्यावेळी मी तुझ्या आईसोबत असण्याचा हट्ट केला होता. तेव्हा डॉ एन के शाह यांनी मला ओटीरूममधून हाकलून दिले होते. ते म्हणाले होते, “चलो बहार निकलो, अमेरिका मे होता है ऐसा. यहा नही, चलो चलिये बाहर”. तुझी वाट पाहत वर खाली चालत मी अस्वस्थ होतो. तुझ्या जन्मानंतर २५ मिनिटांनी दरवाजा उघडला आणि नर्स एका छोट्या परीला हातात घेऊन आली तो क्षण मला अजूनही आठवतो. मी तुला माझ्या हातात धरले, ती म्हणाली तू आता घेऊ शकत नाहीस थोडा वेळ थांब, पण मी तिचे ऐकले नाही.

मी तुला खूप नाजूक हातांनी हळूवारपणे धरले होते आणि त्या क्षणापासून आजपर्यंत मी आनंदाच्या अवस्थेत आहे.कारण देवाने मला तुला भेट दिली, माझी छोटी परी. मी आणि तुझी आई आम्ही भाग्यवान आहोत की तू मुलगी म्हणून आमच्या आयुष्यात आलीस, आणखी काय हवे आहे. या दिवशी आम्ही दोघेही तुला भरभरून आशीर्वाद देतो. तुझ्या सर्व इच्छा आणि स्वप्ने पूर्ण होवोत. देव तुला सर्व सुख आणि यश देवो. तु यशाचे सर्वोच्च शिखर आणि जीवनातील सर्वोत्तम गोष्टी साध्य कराव्यात असे आशीर्वाद. पुन्हा वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि तुझ्यावर २३४५ अनंत प्रेम.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.