Breaking News
Home / जरा हटके / हा आकडा लोकांसमोर आला तर धक्का बसेल.. महाराष्ट्रात मराठी सिनेमांचं कटू सत्य आहे
miling gawali movie tejaswini
miling gawali movie tejaswini

हा आकडा लोकांसमोर आला तर धक्का बसेल.. महाराष्ट्रात मराठी सिनेमांचं कटू सत्य आहे

काही कारणास्तव चित्रपट पूर्ण होत नाहीत किंवा ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीत याचे एक महत्वाचे कारण असते ते म्हणजे पैसा. चित्रपट बनवण्यासाठी अनेक निर्माते प्रयत्न करतात मात्र यासाठी ते आपलं घर देखील गहान ठेवतात. याचे अलीकडच्या काळात उदाहरण पहायचे झाले तर स्वराज्यरक्षक संभाजी मालिका. पुरेसा पैसा उपलब्ध होत नव्हता तेव्हा अमोल कोल्हे यांनी स्वतःचे राहते घर विकले होते अशी चर्चा झाली होती. गावरान बाज असलेला रांगडा नायक ​विलास रकटे यांनी सुद्धा दोन चित्रपट निर्मितीसाठी जमीन गहाण ठेवली होती. अगदी चित्रपटाचे जनक म्हणून ओळखले जाणाऱ्या दादासाहेब फाळके यांनी सुद्धा पहिला चित्रपट बनवण्यासाठी पत्नीचे दागिने विकले होते.

miling gawali movie tejaswini
miling gawali movie tejaswini

मराठी सृष्टीत अशी बरीचशी उदाहरणं तुम्हाला सापडतील. चित्रपट सृष्टीतील ही वास्तविकता मांडण्याचा प्रयत्न अभिनेते मिलिंद गवळी यांनी देखील केला आहे. मिलिंद गवळी यांनी अभिनित केलेला तेजस्विनी हा चित्रपट जवळपास ९० टक्के पूर्ण झाला होता. मात्र पुरेशा पैशांअभावी चित्रपट पूर्णत्वास यायला अडचणी आल्या. ही खंत व्यक्त करताना मिलिंद गवळी यांनी मराठी चित्रपटाचे एक भयाण वास्तव समोर आणले आहे. ते म्हणतात की, तेजस्विनी माझा डबल रोल, चित्रपट ९० टक्के पूर्ण. चित्रपटात महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारणारे अतिशय गोड व्यक्तिमत्व म्हणजे आनंद अभ्यंकर. मुंबई पुणे हायवे अपघातात गेले. निर्माते मस्के यांनी राहतं घर गहाण ठेवलं होतं चित्रपट करण्यासाठी. चित्रपटात शर्वरी जमिनीस, डॉक्टर विलास उजवणे असे कलाकार आहेत.

miling gawali sharvari jamenis
miling gawali sharvari jamenis

दिग्दर्शक सतीशराव रणदिवे यांच्याबरोबरचा माझा पाचवा का सहावा चित्रपट होता. आम्ही सगळ्यांनी खूप प्रयत्न केला हा चित्रपट पूर्ण करून तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा. पण काही गोष्टी आपल्या हातातच नसतात, प्रत्येक चित्रपटाचं आपलं नशीब असतं. मराठी चित्रपट करणे हे एका निर्मात्यासाठी फार सोपी गोष्ट नाहीये, त्याच्या नशिबाने जर पूर्ण झालाच तर आपल्याकडे डिस्ट्रीब्युटर्स हात लावत नाहीत. इंग्रजी हिंदी दक्षिणात चित्रपटांना जसा रिस्पॉन्स देतात तसा मराठी चित्रपटांना मिळत नाही. प्रोड्युसरला स्वतः रिलीज करावा लागतो किंवा मग एखादा रिलीजिंग पार्टनर घ्यावा लागतो. प्रोड्युसरला LIFO, last In First Out सिस्टीम ने फसवतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपटांपेक्षा भोजपुरी नेपाळी चित्रपट जास्ती पैसा कमावतात. साऊथ चित्रपट तर पैसा कमावतातच कमवतात.

आत्ताचा Pushpa Telugu, KGF & Kantara Kannada, महाराष्ट्रात खोर्याने पैसा कमावतात. महाराष्ट्र मराठी माणसांचा आहे, पण मराठी सिनेमांचा नाही हे कटू सत्य आहे. Statistics काढले, Research केला तर किती मराठी प्रोड्युसर जगले आहेत किंवा जिवंत राहिले आहेत, पैसे कमवणे तर लांबच राहिलं. हा खरा आकडा जर लोकांसमोर आला, तर धक्का बसेल. मराठी चित्रपट चांगले नसतात किंवा वाईट असतात असं नाहीये. अतिशय सुंदर विषय सादरीकरण आणि उत्तम अभिनय, असलेले असंख्य चित्रपट येऊन गेले. मराठी प्रोडूसर मात्र जगला नाही, तेजस्विनी चित्रपटाचे प्रोड्युसर मस्के यांचं गहाण घर कालांतराने कन्स्ट्रक्शनच्या धंद्यातून सोडून घेण्यात त्यांना यश मिळालं. त्या घरामध्ये तेजस्विनी चित्रपटाचे नऊ अतिशय उत्कृष्ट गाणी आणि ९० टक्के पूर्ण झालेला चित्रपट, कुठल्यातरी कोपऱ्यात पडला असेल.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.