दरवर्षी जगभरातील लोक दिवाळी सण उत्साहात साजरी करतात. हा सण नवीन सुरुवात आणि वाईटावर चांगल्याचा विजय आणि अंधारावर प्रकाशाचे प्रतीक आहे. साधारणपणे पाच दिवस चालणाऱ्या सणात कुटुंबातील सदस्यांसह एकत्र येणे, चवदार फराळाचा आस्वाद घेणे, नेत्रदीपक फटाके वाजविणे आणि मंदिरांना भेट देणे यांचा समावेश होतो. सिने सृष्टीतही दिवाळीचा पवित्र सण धुमधडाक्यात साजरा होत आहे.
दिवाळीच्या दिवशी सुंदर आणि स्टायलिश दिसण्यासाठी सिने कलाकारांनी वेगवेगळ्या पारंपरिक वेशभूषा वापरल्या आहेत. या मराठी लोकप्रिय अभिनेत्री दिवाळी सणानिमित्त पारंपारीक वेशभूषेत कमालीच्या सुंदर दिसत आहेत. अमृता खानविलकर, रुचिरा जाधव, प्राजक्ता माळी, स्वाती पानसरे, दीपाली सय्यद, तेजश्री प्रधान, संस्कृती बालगुडे, रिंकू राजगुरू, श्रुती मराठे, समिधा गुरु, माधवी नेमकर, शिवानी बावकर, लोकप्रिय मराठमोळी जोडी प्रिया बापट आणि उमेश कामात, श्रेयस तळपदे, प्रसाद ओक, अवधूत गुप्ते, संकर्षण कऱ्हाडे या अभिनेत्री अभिनेत्यांनी आपल्या मराठमोळा आणि दमदार अभिनयामुळे लोकांच्या मनावर राज्य केले आहे, आजचा या सर्वांचा लूक एकदम झक्कास आहे. या सर्व फोटोमध्ये अमृता खूपच सुंदर आणि स्टायलिश दिसत आहे, अमृताच्या हसतमुख फोटोशूटने चाहत्यांना वेड लावले आहे.
अमृताची हि शैली अतिशय सुंदर आणि वेगळी आहे. निळ्या रंगाच्या नेसलेल्या साडीत ती खूपच शोभून दिसत आहे. या दिवाळीत सुंदर आणि स्टायलिश दिसण्यासाठी तुम्हीही या अभिनेत्रींच्या स्टाईलची कॉपी करू शकता. मराठमोळ्या अभिनेत्रींच्या स्टाईलमध्ये तुम्ही देखील खूप सुंदर दिसाल आणि सर्वजण तुमची प्रशंसा करतील. जर तुमचा याहून हटके लूक असेल तर आम्हाला कमेंट मध्ये फोटो पाठवून नक्की कळवा..