अभिनेत्री सुलेखा तळवलकर या मराठी चित्रपट, नाट्य तसेच मालिका अभिनेत्री आहेत. मराठी सृष्टीत आपले स्थान टिकवून ठेवण्याआधी त्यांनी काही हिंदी मालिकांमधून महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. आज त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात…
सुलेखा तळवलकर या दिवंगत अभिनेत्री, दिग्दर्शिका स्मिता तळवलकर यांच्या सून आहेत. रामनारायन रुईया कॉलेजमध्ये असताना नाट्यवलय या थेटर ग्रुपशी त्या जोडल्या गेल्या. सातच्या आत घरात या व्यावसायिक नाटकातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पहिले पाऊल टाकले. झी टीव्ही वरील ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ या हिंदी मालिकेतून त्यांचे छोट्या पडद्यावर आगमन झाले. त्यानंतर सुलेखा तळवलकर यांनी अनेक हिंदी मालिका अभिनित केल्या. अवंतिका, मारत असंभव, कुंकू, शेजारी शेजारी पक्के शेजारी, कदाचित, चार चौघी, टेक केअर गुड नाईट अशा मालिका आणि चित्रपटांमधून त्यांचा प्रवास सुरु झाला तो आजतागायत माझा होशील ना ,सांग तू आहेस का अशा विविध मालिकांमधून बहुतेकदा त्यांच्या वाट्याला विरोधी भूमिकाच आलेल्या पाहायला मिळाल्या. त्यामुळे छोट्या पडद्यावरील खलनायिका असा शिक्का त्यांच्यावर बसल्यास वावगे ठरायला नको. अगदी सहनायिका असो वा आईच्या भूमिका त्यांना बऱ्याच वेळा विरोधी भूमिकाच मिळालेल्या आहेत.
सुलेखा तळवलकर या गेल्या काही दिवसांपासून स्वतःचे युट्युब चॅनल चालवत आहेत. त्या माध्यमातून आजवर त्यांनी मराठी सृष्टीतील अनेक मान्यवर कलाकारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. या मुलाखतींना चाहत्यांकडून उत्तम असा प्रतिसाद मिळतो आहे. अंबर तळवलकर हे सुलेखा तळवलकर यांचे पती. मुंबई स्थित तळवलकर हेल्थ क्लबचे ते डायरेक्टर आहेत. आर्य आणि टिया ही दोन अपत्ये त्यांना असून टियाला कुकिंगची जास्त आवड आहे. वेगवेगळ्या रेसिपीजचे व्हिडीओ ती सोशल मीडियावर नेहमीच शेअर करताना दिसत असते.
View this post on Instagram
नवनवीन कलाकारांविषयी जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता तसेच आम्हाला पत्रे देखील लिहू शकता. आमची टीम जास्तीत जास्त मागणी आलेल्या चाहत्यांना प्राधान्य देईल. आमच्याबरोबर जोडलेले रहा आणि आमच्या फेसबुक पेज वर देखील आपल्या आवडत्या नायक नायिकांसाठी लाईक, फॉलो आणि शेअर करा.