मराठी मालिका आणि चित्रपटांमधून विरोधी भूमिका रेखाटून मराठी जणांच्या घराघरात पोहोचलेली सर्वांग सुंदर अभिनेत्री अभिज्ञा भावे. मालिकांमधील निगेटिव्ह भूमिका इतकेच अभिज्ञा सोशल मीडिया मधून स्टायलिश आऊटफिट साठीही नेहमी चर्चेत राहिली आहे. याचे कारण म्हणजे अभिज्ञा भावे आणि तेजस्विनी पंडितने मिळून चालवित असलेला तेजाज्ञा हा कपड्यांचा ब्रँड, जो थोड्याच कालावधीत मराठी कलाकारांमध्ये फेमस झाला. अभिज्ञा सोशल मीडियावर तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते, तिच्या कमालीच्या फॅशन सेन्स मुळे चाहत्यांना मराठमोळ्या लूक इतकाच वेस्टर्न आऊटफिटही आवडत आला आहे.
मालिकांमधून रसिक प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या अभिज्ञाने तुला पाहते रे, खुलता कळी खुलेना, देवयानी, रंग माझा वेगळा अशा मराठी मालिका तसेच प्यार कि ये एक कहानी, लव्ह यु जिंदगी, मूव्हिंग आउट या हिंदी मालिका आणि वेब सिरीज मध्ये काम केले आहे. तसचे काही दिवसांपूर्वी चला हवा येऊ द्या मध्येही कॉमेडी स्किट्स करताना दिसली होती. खुलता कळी खुलेना तसेच रंग माझा वेगळा या दोन्ही मालिकांत तिने साकारलेली नकारात्मक भूमिका प्रेक्षकांना अतिशय आवडली होती. अभिज्ञा भावेने तिच्या कारकिर्दीत खूप प्रशंसा आणि बरीच ओळख मिळवली असली तरीही ती अजूनही मुख्य नायिकेच्या भूमिकेच्या रूपात यश मिळविण्यासाठी धडपडत आहे. अभिज्ञा इंस्टाग्रामवर सक्रीय असून ती तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. फॅशन आणि अभिज्ञा भावेचं नात तसं फारचं जवळचं आहे. चंदेरी दुनियेत येण्याअगोदर ती एअर होस्टेस देखील होती.
ग्लॅमरस लूक आणि परफेक्ट फॅशन सेन्समुळे ती कमालीची सुंदर दिसते. सोशल मीडियावर एक्टीव्ह असणाऱ्या अभिज्ञाने पिवळ्या रंगाची फ्लोरल प्रिंट असलेली बिकिनी शेअर केली आहे. “सुंदर फोटो घेण्यासाठी तुम्हाला मालदीवमध्ये असण्याची गरज नाही” असेही ती मजेने म्हणते. तिचा हा हटके लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला असून चाहत्यांना खूपच आवडला आहे. अगदी सिने तारकांनाही यावर प्रतिक्रिया देण्याचा मोह आवरला नाही. तसेच रसिकांनीही प्रोत्साहित करणाऱ्या तसेच मजेशीर कमेंटही केल्या आहेत.