अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिने संगीत सम्राट या रियालिटी शोचे रोहित राऊत सोबत सूत्रसंचालन केले होते. दिया और बाती हम, मेरी आशिकी तुम से ही, एक तारा, दुहेरी अशा मालिका आणि चित्रपटातून अभिनय साकारला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेकनोलॉजीची पदवी तिने प्राप्त केली आहे. ९ फेब्रुवारी २०१३ रोजी उर्मिलाने सुकीर्त गुमस्ते यांच्यासोबत लग्न केले. उर्मिला नेहमीच आपल्या इंस्टाग्रामवरून व्हिडीओजच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते.
काही दिवसांपूर्वी उर्मिला निंबाळकर हिच्या मुलाचं मोठ्या थाटात बारसं साजरं करण्यात आलं. या सोहळ्याला नातेवाईक, मित्रमंडळींना त्यांनी आमंत्रित केले होते. उर्मिलाने तिच्या बळावर चांगले संस्कार व्हावेत या हेतूने सद्गुरू वामनराव पै यांचे सुपुत्र प्रल्हाद पै यांना देखील या सोहळ्याला आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी उर्मिलाचा भाऊ आयपीएस वैभव निंबाळकर हे देखील उपस्थित होते. बारश्याला निळ्या रंगाची थीम आयोजित केली असल्याने सगळ्यानी त्याच रंगाचे कपडे परिधान केलेले पाहायला मिळाले हे विशेष. आपल्या बाळाचं नाव काय असावं यावर चर्चा सुरू झाली त्यावेळी “अथांग ” या नावावर त्यांनी शिक्कामोर्तब केला. ज्याचा थांग कधीच लागत नाही तो म्हणजे अथांग. व्यापक, समुद्राला, आकाशाला हे विशेषण दिलं जातं नावाप्रमाणेच त्याचे विचार त्याचं मन व्यापक असुदेत त्याला कसलीही जात, धर्म, भाषा, पंथ, नकारात्मकतेची कुठलीच कुंपणं त्याच्या मनाला नकोत या विचाराने त्यांनी आपल्या बाळाचं नाव अथांग ठेवायचं ठरवलं.
उर्मिलाच्या बाळाच्या बारश्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि तिच्या बाळाला देखील भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत. उर्मिला निंबाळकर हीने काही दिवसांपूर्वी आपल्या डोहाळे जेवणाचा व्हिडीओ युट्युबवरील तिच्या चॅनलवर अपलोड केला होता . पुण्यातील प्रसिद्ध ढेपे वाडा येथे तिचा हा सोहळा मोठ्या थाटात पार पडला होता. तिच्या या व्हिडिओला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला असून अक्षरशः लाईक्सचा वर्षाव झाला. उर्मिला नेहमीच व्हिडिओजच्या माध्यमातून चाहत्यांना मेकअप बद्दल, साडी नेसण्याबद्दल सजेशन देत असते. त्याचमुळे तिचे मार्गदर्शन करणारे हे व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात पाहिलेही जातात.