एकसारख्या नावाच्या गोंधळामुळे वृत्त माध्यमं देखील कुठलीही शहानिशा न करता दुसऱ्याच व्यक्तीचे फोटो दाखवण्याचा घाट घालताना दिसतात. असा अनुभव मराठी सृष्टीतील अनेक कलाकारांना आलेला आहे. काही दिवसांपूर्वी संतोष जुवेकर याने देखील नावाच्या गोंधळामुळे लोकांनी मला धारेवर धरले होते याचा खुलासा केला होता. आता असाच एक मजेशीर अनुभव मराठी अभिनेत्याला आलेला पाहायला मिळतो आहे. आम आदमी पार्टीच्या पंजाब येथील एका नेत्याची राज्यसभेवर निवड करण्यात आली. म्हणून अभिनेता संकेत पाठक याचे फोटो मीडिया माध्यमातून व्हायरल होताना दिसत आहेत. आम आदमी पार्टीचे डॉ संदीप पाठक यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे.
मात्र डॉ संदीप पाठक यांच्या जागी मराठी चित्रपट, नाट्य अभिनेता संदीप पाठकचा एक फोटो चॅनलवर दाखवला जात आहे. ही बाब संदीपच्या लक्षात येताच त्याने यावर मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केलेली पाहायला मिळत आहे. ‘तो मी नव्हेच’ असे संदीप पाठक फेसबुकवर दिलेल्या पोस्टमध्ये म्हणतो आहे. आणि “आप”ल्याला ह्यात ओढू नका. असेही तो मजेत म्हणताना दिसत आहे. या नावाच्या गोंधळामुळे संदीपचा फोटो वापरण्यात आला असून तो राजकारणात कधी उतरला असा प्रश्न आता त्याच्या चाहत्यांना वाटू लागला आहे. सदर बातमी ज्या चॅनलवरून प्रसारित करण्यात आली आहे त्या बातमीत डॉ संदीप पाठक यांचे अभिनंदन केलेले दिसत आहे.
तिथेच अभिनेता संदीप पाठक याचा टोपी घातलेला हात जोडतानाचा एक फोटो शेअर केला आहे. शिवाय या बातमी मधला मजकूर देखील पंजाबी भाषेत नसून तो गुजराथी भाषेत छापण्यात आल्याने संदीपच्या चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलेले पाहायला मिळत आहे. ऑन द स्पॉट न्यूज या वृत्त वाहिनीने हा मजकूर छापलेला असून त्यात हा मोठा गोंधळ केलेला स्पष्टपणे दिसून येत आहे. ही चूक लक्षात आणून देण्यासाठी संदीपने योग्य ती पावले उचलली आहेत. शिवाय आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना देखील संदीपने टॅग केले आहे. दरम्यान संदीपच्या या खुलास्यावर त्याच्या चाहत्यांनी अनेक गमतीशीर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
त्याने शेअर केलेली ही माहिती सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. संदीप पाठक सध्या वऱ्हाड निघालंय लंडनला या नाटकाच्या दौऱ्यामध्ये व्यस्त आहे. याशिवाय श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वे यांची प्रमुख भूमिका असलेल्या आपडी थापडी या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये तो कोकणाचे दौरे करताना दिसतो. या व्यस्त शेड्युल मधून अशा बातम्या मात्र नाहक त्रास देणाऱ्या ठरतात. परंतु संदीपच्या विनोदी शैलीमुळे त्याने ही गोष्ट गमतीशीर केलेली पाहायला मिळत आहे.