Breaking News
Home / मराठी तडका / रात्रीस खेळ चाले मालिकेतील शेवंता झाली विवाहबद्ध.. या कलाकारासोबत बांधली गाठ
krutika tulaskar wedding
krutika tulaskar wedding

रात्रीस खेळ चाले मालिकेतील शेवंता झाली विवाहबद्ध.. या कलाकारासोबत बांधली गाठ

आज मराठी सृष्टीतील दोन कलाकार विवाहबंधनात अडकलेली पाहायला मिळत आहेत. आज १४ डिसेंबर रोजी बाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेता सुमित पुसावळे ह्याने मोनिका महाजन सोबत लग्नगाठ बांधली. त्याच्या लग्नाचे खास फोटो आज सकाळपासूनच चांगलेच चर्चेत आहेत. सुमित सोबतच मराठी सृष्टीतील आणखी एक अभिनेत्री आज विवाहबंधनात अडकलेली पाहायला मिळत आहे. झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले या लोकप्रिय मालिकेतील शेवंता म्हणजेच अभिनेत्री कृतिका तुळसकर आणि विशाल देवरूखकर यांनी अगदी साधेपणाने लग्न केलेले आहे.

krutika tulaskar wedding
krutika tulaskar wedding

रात्रीस खेळ चाले या मालिकेतील दुसऱ्या पर्वात शेवंताचे पात्र खूपच गाजले होते. शेवंताची भूमिका अपूर्वा नेमळेकरने सुंदर अभिनयाने वठवली होती. रात्रीस खेळ चालेच्या तिसऱ्या पर्वात देखील ती याच भूमिकेत पाहायला मिळाली. मात्र काही दिवसातच तिने या मालिकेतून काढता पाय घेतला होता. बॉडी शेमिंगवरून खिल्ली उडवणे, कलाकारांकडून अपमानास्पद वागणुक तसेच भूमिकेला पुरेसा वाव मिळत नसल्याचे कारण सांगून अपूर्वाने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ह्या भूमिकेसाठी कृतिका तुळसकर हिची निवड करण्यात आली. कृतिकासाठी शेवंताची भूमिका साकारणे हे खरं तर एक मोठे आव्हानच होते. मात्र तिने ही भूमिका तिच्या अभिनयाने लीलया साकारलेली पाहायला मिळाली होती.

krutika tulaskar vishal devrukhkar
krutika tulaskar vishal devrukhkar

कृतिका तुळसकर हीने नाटकातून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते. विजेता, बबन, बेनवाड, पाशबंध, बाय गो बाय अशा चित्रपटातून ती महत्वाच्या भूमिकेत दिसली होती. आज कृतिकाने दिग्दर्शक असलेल्या विशाल देवरुखकर सोबत लग्नाची गाठ बांधलेली आहे. विशाल देवरुखकर हा चित्रपट दिग्दर्शक आहे. बॉईज, बॉईज २ आणि ३ असे एका मागोमाग एक हिट चित्रपटाचे दिग्दर्शन केले. गर्ल्स हा आणखी एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट त्याने दिग्दर्शित केला. लहानपणी बाल नाटकात अभिनय साकारला, चेतना कॉलेजमध्ये असताना विशालने एकांकिका स्पर्धांमधून सहभाग दर्शवला. पुढे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काही चित्रपटासाठी त्याने काम केले. बॉईज हा त्याने दिग्दर्शन केलेला पहिला चित्रपट ठरला, प्रेक्षकांनी या चित्रपटाचे मोठे कौतुक केले.

त्यानंतर याच पठडीतील सिक्वल असणारे पार्ट २ आणि ३ त्याने प्रेक्षकांच्या भेटीला आणले. याच प्रवासात त्याची कृतिकाशी ओळख झाली. अनेक वर्षांच्या भेटीगाठी नंतर आज हे दोघेही विवाहबंधनात अडकले आहेत. काल या दोघांची हळद साजरी करण्यात आली. तर आज १४ डिसेंबर रोजी त्यांनी अगदी मोजक्या मित्रमंडळींना आणि नातेवाईकांच्या समवेत लग्नगाठ बांधलेली पाहायला मिळते. अभिनेत्री कृतिका तुळसकर आणि दिग्दर्शक विशाल देवरूखकर या नवदांपत्यास निवास प्रित्यर्थ खूप खूप शुभेच्छा.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.