क्रांती रेडकर ही कायम सोशल मीडियावर तिच्या मुलींचे मजामस्ती करणारे व्हिडीओ शेअर करत असते. झिया आणि झ्यादा ही त्यांची नावं. या नावाने क्रांती रेडकर हिने कपड्यांचा ब्रँड सुद्धा बाजारात आणलेला आहे. छबिल आणि गोदो ही तिच्या जुळ्या मुलींची टोपण नावं आहेत. काही दिवसांपूर्वीच क्रांतीची मुलगी झीयाच्या पायाला दुखापत झाली होती. त्यात पायाला प्लास्टर करण्यात आले होते. क्रांतीने नुकताच या दोन्ही मुलींचा एक व्हिडीओ शेअर केला होता, त्यात तिची मुलगी लंगडताना दिसली.
तेव्हा झ्यादा तिला हाताने सावरत होती. झियाने संपूर्ण महिनाभर तिच्या पायात प्लास्टर कास्ट घातले होते. आणि या आव्हानात्मक काळात तिला चालण्याची कला पुन्हा आत्मसात करावी लागली होती. आपली मुलगी बहिणीला कशी मदत करते आणि तिला बरे होण्यासाठी कसे साहाय्य करते हे तीने व्हिडिओत दाखवले होते. क्रांतीने तिच्या चाहत्यांना दुखापतीबद्दल माहिती देताना म्हटले आहे की, तर झियाच्या पायात एक महिना प्लास्टर कास्ट होता. ते आता काढले आहे, ती अजूनही पुन्हा चालायला शिकत आहे. ती धाडसी, सहनशील आणि समजूतदार आहे, पण इथे आमची खरी हिरो मिस छबिल वानखेडे आहे. जी सावलीसारखी तिच्या पाठीशी उभी आहे.
गेले महिनाभर क्रांतीच्या मुलीला पायाला दुखापत झाली असल्याने छबिल तिची काळजी घेत होती असे क्रांती म्हणते. शाळेतील तिच्या शिक्षिका देखील छबिलचे कौतुक करताना सांगत होते की, झ्यादा कितना करती है झिया के लिये. तिची पुस्तकं काढून देते, बॅग भरायला मदत करते, टॉयलेटला जाण्यासाठी तिचा हात धरते. एवढेच नाही तर टिफिन सुद्धा काढून देते. झियाच्या पायाला दुखापत आहे मात्र तरीही झ्यादा तिला छोट्या छोट्या गोष्टींसाठी मदत करते. असे त्यांच्या शाळेतल्या शिक्षिका क्रांतीला सांगत होत्या. छबिलची बहिणीबाबतची ही एवढी काळजी पाहून क्रांतिला तिच्या मुलीचे खूप कौतुक वाटत आहे. आणि त्याचमुळे क्रांतीला एवढूशा वयातला मुलीचा समजूतदारपणा भावला आहे.