केतकी चितळे आणि तिची विधाने ही नेहमी चर्चेचा विषय ठरली आहेत. तर काही वादग्रस्त विधानांमुळे तिला लोकांनी ट्रोलही केलं आहे. तिच्या याच भूमिकेमुळे केतकीला जेलची हवा देखील खावी लागली होती. मात्र आजही ती परखड मत व्यक्त करायला घाबरत नाही. नुकतेच केतकीने असेच एक विधान केलेले पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र सरकारने आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती स्थापन केली आहे. श्रद्धा वालकरच्या केस प्रकरणी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ही समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. ज्या कोणी जोडप्याने आपल्या कुटुंबियांच्या विरोधात जाऊन लग्न केलं आहे, त्यांना गरज पडल्यास ही समिती मदत करणार आहे.
मात्र या निर्णयामुळे अनेकांनी विरोध दर्शवण्यास सुरुवात केली. या समितीमुळे व्यक्ती स्वातंत्र्यावर आडकाठी येईल अशी चिंता व्यक्त करण्यात येऊ लागली. मात्र समन्वय या नावातच या समितीच्या स्थापन करण्यामागचा हेतू काय असेल याचे विश्लेषन सुशील कुलकर्णी यांनी करून दिले आहे. या समितीचा नेमका उद्देश काय आहे हे जाणून घेण्याची गरज आहे, असे परखड मत केतकीने देखील व्यक्त केले आहे. आपल्या पोस्टमध्ये केतकीने याच मुद्द्याला अनुसरून म्हटले आहे की, समिती कुठली, कशासाठी, निर्माण करण्यामागचा विचार का आला असेल. याच्याशी आम्हाला काही देणेघेणे नाही. सनातन धर्माला मारणे ते ही महाराजांचे नाव घेऊन हा आमचा उद्देश. स्वघोषित मावळे तर तसेही माथ्यावर चंद्रकोर.
बाईकवर राजमुद्रा (मुळात राजमुद्रा, राजा सोडल्यास कुणा दुसऱ्याने वापरणे फक्त बेकायदेशीर नव्हे तर घोर अपमान आहे. पण आम्ही स्वघोषित असल्याने आम्ही काहीही करायला मोकळे आहोत. अगदी ज्या राजाच्या नावाने लढतो त्यांचा अपमान ही, असो) लावून तयार असतातच. एक मेसेज मिळताच किक मारून अशुद्ध मराठीत (महाराजांना ६ भाषा अस्खलित येत असत, इकडे मात्रृ पित्रृ भाषेची बोंब, असो) आरडाओरडा सुरू. सनातनी हिंदू मारला जातोय. मालवणी ऑर्लिम, मुंबई मध्ये मुसलमान किंवा क्रिस्ती आहेत व सनातनी हिंदूला घर दिले जात नाही, ही सत्य परिस्थिती मी स्वतः अनुभवली आहे. चार पैश्यात घोषणा करा, जातीयवाद निर्माण करा, सनातनी हिंदू झोपला आहे याचा फायदा घ्या.
जे जागे आहेत त्यांना तुरूंगात टाका व केसेच ठोका. पण लक्षात असुद्या, झोपलेला जेव्हा जागा होतो तेव्हा तो पेटून उठतो. समिती स्थापन करण्यामागचा हेतू काय आहे हे सविस्तरपणे सांगण्याचा प्रयत्न तिने केला आहे. तिच्या या मतावर अनेकांनी सकारात्मक प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. उठसूट जातीवाद घडवून आणणाऱ्यालाही तिने या पोस्टमधून खडेबोल सुनावले आहेत. त्यामुळे केतकीच्या विचारांचे कौतुकही होत आहे.