Breaking News
Home / मराठी तडका / स्टार प्रवाहवरील मालिकेतील अभिनेत्याचा अपघात..
vijay andalkar
vijay andalkar

स्टार प्रवाहवरील मालिकेतील अभिनेत्याचा अपघात..

​स्टार प्रवाहवरील पिंकीचा विजय असो या मालिकेतील अभिनेता विजय आंदळकर याचा अपघात झाला असल्याचे समोर आले आहे. या अपघातामुळे विजयच्या हाताला बरेचसे खरचटलेले तुम्हाला दिसून येईल. सोशल मीडियाच्या माध्यमातून विजयने आपल्या अपघाताची बातमी सांगितली आहे. हाताला बरेच खरचटले असल्याने विजयला काही दिवस काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. हाताची दुखापत पाहून चाहत्यांनी चिंता व्यक्त केलेली पाहायला मिळते आहे. पिंकीचा विजय असो या मालिके​​त विजयने युवराजची भूमिका साकारली आहे.

vijay andalkar
vijay andalkar

पिंकीवर असणारे प्रेम युवराज आपल्या आईसमोर व्यक्त करत नाही. मात्र पिंकीच्या प्रत्येक अडचणीत तो तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहताना दिसला आहे. म्हणूनच युवराजचे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेले आहे. अभिनेत्री शरयू सोनवणे हिने पिंकीचा विजय असो या मालिकेअगोदर कोठारे व्हिजन प्रस्तुत प्रेम पोईजन पंगा या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. महेश कोठारे यांनी शरयुला अभिनयाची मोठी संधी मिळवून दिली होती. पिंकीचा विजय असो मालिकेत शरयूचा डॅशिंग अंदाज आणि बिनधास्तपणा अभिनयाने चांगलाच साकारलेला पाहायला मिळतो आहे. शरयूची ही दुसरीच मालिका असली तरी तिच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या भूमिकांमुळे दोघांनीही प्रेक्षकांच्या मनात जागा केली आहे.

vijay andalkar wife rupali zankar
vijay andalkar wife rupali zankar

विजयची अपघाताची बातमी समजताच त्याच्या चाहत्यांनी तसेच मराठी सृष्टीतील कलाकारांनी त्याला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. अपघातामुळे विजयच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे विश्रांतीसाठी काही दिवसांसाठी तो मालिकेतून ब्रेक घेईल असे सांगण्यात येत आहे. मालिकेतून शूटिंग आटोपून घरी जात असताना विजयच्या गाडीला अपघात झाला. अपघातात गाडी बऱ्याच अंतरापर्यंत घसरत गेल्याने त्याच्या हाताला खरचटले. तर शरीराच्या इतर ठिकाणीही त्याला मुका मार लागला आहे. या अपघातातून विजय सुखरूप बचावला असला तरी काही दिवस त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.