केतकी चितळे जे बोलते त्यामागे नक्कीच काहीतरी कारण दडलेले असते. अनेकदा हिंदूंच्या सणांना शुभेच्छा देताना काही वेळेस इंग्रजी भाषेचा वापर केला जातो. मात्र जर हिंदूंचे सण आहेत तर तुम्ही मातृभाषेतून शुभेच्छा द्यायला हव्यात असे मत तिने व्यक्त केले. एवढेच नाही तर शुद्ध मराठी भाषेतून आपण शुभेच्छा द्यायला हव्यात असा आग्रह ती धरताना दिसते. गेल्या महिन्यात अटक झाल्याप्रकरणी तिने सर्व घटनांचा उलगडा गेला होता. तिच्यासोबत वाद घालणाऱ्या आणखी दोन व्यक्तींना काही कशी शिक्षा झाली नाही असे मत तिने मांडले होते. केतकीचा हा मुद्दा अनेकांना पटला देखील.
लोकांना सत्य ऐकायला किंवा वाचायला आवडत नाही कारण ते धोकादायक आहे. सत्य लपवण्यासाठी, खोटे लपवण्यासाठी ते लोकांची हत्या करायला तयार असतात. असे म्हणत तिने सत्य आणि मृत्यू बद्दल एक मत व्यक्त केले. जर मी अपघातात किंवा संशयास्पद परिस्थितीत मरण पावले किंवा माझ्या गळ्यात फास लागला. किंवा माझ्या औषधांवर ओव्हर डोज्ड झाल्याचा दावा केला तर सत्य जाणून न घेताच असा शिक्का बसवलं जाईल. होय, मी आत्महत्याग्रस्त आहे. पण मी पुन्हा तसा प्रयत्न करणार नाही अशी शपथ मी घेतली. आणि या वेळी आत्महत्या होणार नाही, हे नक्की. माझ्या मृत्यूनंतर जर तुम्ही माझ्या मृत्यूची बातमी वाचली तर त्याचा अर्थ काय ते तुम्हाला माहीत आहे. असे धक्कादायक विधान तिने केले होते.
केतकीने वाद घातलेले अनेक मुद्दे पटतात तर काहींना विरोध केला जातो. पण आता आपण कलाकार आहोत हे दाखवण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतात याचाही खुलासा तिने इथे केलेला आहे. जे लोक सोशल मीडियावरील अकाउंटला अधिकृत बनवण्यासाठी एलोन मस्कला पैसे देतात त्यांनी यावर नक्कीच विचार करायला हवा. एलोन मस्क यासाठी किती पैसे आकारतो हे सुद्धा तिने स्पष्ट केले आहे. याबाबत केतकी म्हणते की, ऑनलाइन प्रमाणीकरणासाठी किती लोक पैसे देत आहेत हे पाहून आश्चर्यचकीत होणारी मी एकमेव आहे का ९०० रुपये प्रति महिना किंवा ९४०० रुपये प्रति वर्ष फक्त एका ब्लू टिकसाठी! एलोन मस्क खूप श्रीमंत आहे यात काही आश्चर्य नाही. लोक किती मूर्ख असतात हे त्याला चांगलेच माहीत आहे.