कन्नड चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार पुनीत राजकुमार हा ज्येष्ठ अभिनेते राजकुमार यांचा मुलगा होता. अभिनेता पुनीत राजकुमार यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने बेंगळुरू येथील रुग्णालयात निधन झाले. तब्बल ३० चित्रपट सुपरहिट देणाऱ्या या अवलिया कलाकाराच्या अकाली निधनाने कन्नड सिनेसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्य अभिनेता म्हणून युवराथना, राजकुमार, अप्पू, पावर, चक्रव्यूव्ह, परमात्मा, वमशी, नम्मा बसवा, माया बाजार, पद्दे हुली, मुंबई टायसन, मौर्य, अरासु, राम आणि अंजनी पुत्र अशा चित्रपटांचा समावेश आहे.
आज सकाळी त्यांना विक्रम हॉस्पिटलमध्ये निष्क्रिय अवस्थेत नेण्यात आले होते. थोड्या वेळा पूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ट्विट केले, “कन्नड सेलिब्रिटी श्री पुनीत राजकुमार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने मला खूप धक्का बसला आहे. कन्नडगरांचे आवडते अभिनेते, अप्पू यांच्या निधनाने कन्नड आणि कर्नाटकचे खूप मोठे नुकसान झाले आहे आणि मी प्रार्थना करतो की देव त्यांना शांती देईल. त्याच्या आत्म्यावर दया करा आणि त्याच्या चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती द्या.” खरे तर पुनीतची चाइल्ड स्टार म्हणून सुरुवात झाली. पुनीत लोकप्रिय गायक देखील होता आणि त्याच्या नृत्य कौशल्याची प्रशंसा नेहमीच केली जायची. पुनीतने २०१२ मध्ये कन्नड कोट्याधिपती या गेम शोची कन्नड सिरीज हू वॉन्ट टू बी अ मिलियनेर सादरीकरण करून टेलिव्हिजन जगतात पदार्पण केले होते. अशा या हरहुन्नरी कलाकाराला कलाकार.इन्फो टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली.