ठरलं तर मग मालिकेतून प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री जुई गडकरी हिचा नुकताच अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातातून जुईला किरकोळ दुखापत झाली असे सांगण्यात आले आहे. पण अपघाताची बातमी समजताच तिच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे. जुईला यामुळे अनेक फोन कॉल्स आणि मेसेजेस येऊ लागले आहेत. चाहत्यांची ही काळजी पाहून जुईने स्वतः तिच्या पोस्टद्वारे या घटनेचा खुलासा केला आहे. जुई सध्या ठरलं तर मग या मालिकेत सायलीची प्रमुख भूमिका साकारत आहे. मालिका सुरू झाली तेव्हापासून गेल्या १३ आठवड्यात या मालिकेने टीआरपीच्या स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले आहे.
अभिनेता अमित भानुशाली आणि जुई गडकरी यांच्या जोडीला प्रेक्षकांनी विशेष पसंती दाखवली आहे. ही बातमी अधोरेखित करताना जुई म्हणते की, १३ वा आठवडा नं १, Only and only grateful माय बाप रसिक प्रेक्षकांचे आभार! तुमच्या प्रेमाने मी भाराऊन गेलेय! बघत राहा “ठरलं तर मग!” सोम ते शनि रात्री ८.३० वाजता STAR Pravah वर. आणि हो, मी ठणठणित आहे! रोज शुट करत आहे! माझ्या accident मुळे मला ”गंभीर” दुखापत झाली. आता मला शुट करता येणार नाही असे व्हिडियोज सध्या फिरत आहेत! त्याकडे कृपया लक्ष देऊ नये!! M alright because of ur blessings and wishes! तसं तर युट्युबवर माझी अनेकदा लग्नं पण झालियेत आणि मला दोन मुलं पण आहेत.
माझे अमेरीकेत, दुबईत बंगले पण आहेत. या गोष्टींकडे लक्ष न दिलेलंच बरं! असो, तुम्ही मालिका बघताय ना? जुईचा अपघात झाला ही बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली आहे. या आपघातातून ती सुखरुप बचावली असली तरी काही माध्यमातून तिच्या अपघाताची बातमी रंगवून सांगितली जात आहे. जुई आता मालिकेतून ब्रेक घेणार अशीही बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने अखेर तिने या बातमीला दुजोरा देत स्पष्टीकरण दिले आहे. सोबतच आपल्या बद्दल सोशल मीडियावर खूप काही गोष्टी रंगवून सांगितल्या आहेत. त्याकडे मी नेहमीच दुर्लक्ष करते असे ती म्हणते. तूर्तास अभिनेत्री जुई गडकरी हिला दीर्घायुष्य लाभो आणि ती निरोगी आयुष्य जगो अशी प्रार्थना तिच्या चाहत्यांकडून केली जात आहे.