सध्या नवरात्रीचं मंगलमय वातावरण आहे. स्त्री शक्तीचा उत्सव सुरू आहे. अशावेळी अभिनेता आदिनाथ कोठारे याला त्याची मुलगी जिजाने एक असा प्रश्न विचारला की क्षणभर तोही विचार करू लागला. पण त्यानंतर त्याने जे काही जिजाला दाखवलं ते बघून जिजाला नवरात्रीचा अर्थ कळाला. कोठारे बापलेकीने दिलेल्या या अनोख्या शुभेच्छा खूप बोलक्या आहेत. सध्या सगळीकडे नवरात्रीचं वातावरण सुरू आहे. पण नवरात्री का साजरी करायची? दुर्गापूजेचं महत्वं काय? या उत्सवात महिला शक्तीला का पूजलं जातं? असे अनेक प्रश्न लहान मुलांच्या मनात येत असतात. त्यांच्या प्रश्नांची कशी उत्तरं द्यायची असा प्रश्न पालकांना पडत असतो.
पण याचं भन्नाट उत्तर शोधून काढलं आहे अभिनेता आदिनाथ कोठारे याने. आदिनाथ आणि ऊर्मिला यांची मुलगी जिजा सोशल मीडियावर नेहमीच एक्टीव्ह असते. पण आता मात्र जिजाने बाबा आदिनाथला एक असा प्रश्न विचारला आहे की, त्यावर आदिनाथने उत्तरादाखल तिला नवरात्रोत्सवातील स्त्रीशक्तीचा खरा अर्थ सांगितला. स्टार किड्स विषयी सेलिब्रिटी कलाकारांच्या चाहत्यांमध्ये नेहमीच उत्सुकता असते. या स्टार किड्सच्या यादीत जिजा कोठारे खूप लोकप्रिय आहे. लहानपणापासूनच जिजाचे व्हिडिओ खूप व्हायरल होत आले आहेत. अभिनेत्री ऊर्मिला कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांची ही लेक इतकी स्मार्ट आहे की ती तिच्या मनातील काही ना काही प्रश्न विचारत असते.
सध्या नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर जिजाने तिच्या मनातील एक प्रश्न बाबा आदिनाथला विचारला आणि त्यानंतर जे काही घडलं ते स्त्री शक्तीचा अभिमान वाढविणारे आहे. आदिनाथ कारमधून जिजाला शाळेत सोडायला निघाला आहे. आदिनाथ कार चालवत शेजारी बसलेल्या जिजासोबत गप्पाही मारतोय. आजूबाजूचं नवरात्री, स्त्री शक्ती वातावरण पाहून जिजा आदिनाथला विचारतेय की, डॅडा, असं काय आहे जे मुलींना करता येत नाही? जिजाच्या या प्रश्नानंतर व्हिडिओमध्ये थेट काही दृश्य दिसतात. ज्यामध्ये समाजातील प्रत्येक स्तरावरील व्यक्ती स्त्रीच्या कार्यक्षमतेविषयी भरभरून बोलतेय. महिला, मुलगी, स्त्री काहीही करू शकते. अशी कोणतीच गोष्ट नाही जी ती करू शकत नाही.
ती घर सांभाळते, ती नोकरी करून पैसे मिळवते. कुटुंबाचा आधार बनते, मुलांचं संगोपन करते. मोठमोठ्या पदावर काम करते, जबाबदारी पेलते, कष्ट करते, अन्याया विरोधात लढू शकते. चुकीच्या गोष्टीविरोधात न्याय मिळवू शकते अशा प्रतिक्रिया देणारे लोक प्रतिक्रिया देतात. शेवटी जिजा म्हणते, हो की रे डॅडा, मुलगी सगळं काही करू शकते. नवरात्रीचा सर्वांना शुभेच्छा. नवरात्री म्हणजे स्त्री शक्तीचा उत्सव. या निमित्ताने आदिनाथने लेक जिजाला अगदी साध्या सोप्या प्रकारे स्त्री शक्तीचं महत्व सांगतो. आदिनाथ लेकीला सांगतो अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या खरं तर मुलींप्रमाणे मुलं करू शकत नाहीत. बाप लेकीच्या या सुंदर संभाषणातील स्त्री बद्दल व्यक्त केलेला हा आदर प्रेक्षकांना खूपच भावला आहे.