शेम टू शेम, माझा अगडबम, लावू का लाथ, शटर, पोलीस लाईन, लाल ईश्क या आणि अशा कितीतरी चित्रपटातून जयवंत वाडकर यांनी आपल्या अभिनयाने विविधांगी भूमिका साकारून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. विनोदी भूमिका असो वा गंभीर भूमिका अशा सर्वच भूमिकेत ते चपखल बसले आहेत. त्यांनी तेजाब सारख्या हिंदी चित्रपटातून देखील छोट्या मोठ्या पण तेवढ्याच महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे आणि जयवंत वाडकर यांच्यातील घनिष्ठ मैत्रीचे किस्से कला विश्वात आजही चांगलेच परिचयाचे आहेत. त्यांच्याच मैत्रीचा वारसा त्यांची मुलं देखील पुढे चालवताना दिसत आहेत.
लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी स्वानंदी बेर्डे आणि जयवंत वाडकर यांची मुलगी स्वामीनी बेर्डे यांच्यातील मैत्री असेच एक मैत्रीचे उदाहरण देता येईल. जयवंत वाडकर यांची मुलगी स्वामिनी वाडकर नुकतीच चर्चेत आली आहे त्याला एक खास कारण देखील आहे. स्वामीनीला अभिनय क्षेत्राची विशेष आवड आहे. सचिन पिळगावकर यांच्या ये है आशिकी या चित्रपटात तिने काम केले होते. स्वामीनीला नृत्याची देखील विशेष आवड आहे. नुकत्याच झालेल्या श्रावण क्वीन २०२२ या सौंदर्य स्पर्धेत स्वामीनीने सहभाग दर्शवला होता. यात तिने अनेक सहभागी स्पर्धकांमधून ‘मिस पर्सनॅलिटी’चा किताब पटकावला आहे. ही बातमी जयवंत वाडकर यांनी जाहीर करताच मराठी सेलिब्रिटींनी स्वामीनीवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
स्वामिनीचा ग्लॅमरस अंदाज तिच्या चाहत्यांना नेहमीच भुरळ घालताना दिसतो. चित्रपटातून अभिनयाची संधी मिळालेल्या स्वामीनीला पुढे जाऊन याच क्षेत्रात काम करायचं आहे. ग्लॅमरस अंदाजात असलेली स्वामिनी मॉडेलिंग क्षेत्रातही नशीब आजमावू पाहत आहे. महाराष्ट्र टाईम्स आयोजित श्रावण क्वीन या स्पर्धेतून बरेच नवखे कलाकार तयार झाले आहे. या स्पर्धेतून पुढे आलेल्या सौंदर्यवतींनी मराठी मालिका तसेच चित्रपट सृष्टीत प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे स्वामीनीचे हे यश तिला या क्षेत्रात येण्यास निश्चितच उपयोगी पडणार आहे. मिस पर्सनॅलिटीचा मन मिळवलेल्या स्वामीनीला पुढील प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन!