अभिनेत्री अर्चना नेवरेकर यांच्या कालादर्पण फाउंडेशनच्या अंतर्गत २७ डिसेंबर रोजी यंदाचा १३ वा कालादर्पण अवॉर्ड सोहळा दिमाखात पार पडला. या अवॉर्ड सोहळ्याचे सूत्रसंचालन सिद्धार्थ चांदेकर आणि क्रांती रेडकर यांनी समर्थपणे सांभाळले. कलाकारांबाबत कुठलाही आकस मनात न ठेवता योग्य त्या व्यक्तीला पुरस्कृत करण्यात येते, असे या अवॉर्ड सोहळ्याचे वैशिष्ट्य अभिनेत्री अर्चना नेवरेकर यांनी बोलून दाखवले. त्यामुळे कोणालाही दुःखी करण्याचा हेतू आमचा मुळीच नाही हे त्यांनी अधोरेखित केले आहे. खरं तर हा अवॉर्ड सोहळा सुरू करण्यामागे अर्चना नेवरेकर यांचे एक खास कारण होते.
एका अवॉर्ड सोहळ्यात अपमानास्पद वागणूक मिळाल्याने त्यांनी स्वतःचा अवॉर्ड सोहळा सुरू करावा अशी कल्पना त्यांच्या मनात घर करून होती. त्यासाठी सहकलाकारांचे पाठबळ, नवऱ्याची भक्कम साथ मिळाली. आज अवॉर्ड सोहळ्याने मोठे यश मिळवले असून मराठी सृष्टीतील एक नामांकित सोहळा म्हणून याला ओळख मिळाली आहे. कालादर्पण सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे या सोहळ्यात कला क्षेत्रासोबतच वृत्त, राजकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करण्यात येते. आसावरी जोशी, अभिजित खांडकेकर, रोहिणी हट्टंगडी, अशोक शिंदे, स्मिता जयकर, मिलिंद गवळी, गिरीजा प्रभू, सुहिता थत्ते. अशोक सराफ, चेतन वडनेरे, अलका कुबल, वर्षा उसगावकर, किशोरी शहाणे या मान्यवरांनी सोहळ्याला उपस्थिती लावली होती.
deeकाल पार पडलेल्या अवॉर्ड सोहळ्यात नवोदित कलाकारांसोबत अनेक दिग्गज कलाकारांचे दर्शन झाले. त्यात निशिगंधा वाड यांच्या मुलीने मात्र सगळ्यांचे लक्ष्य वेधून घेतले. निशिगंधा वाड आणि त्यांची मुलगी ईश्वरी यांनी रेडकार्पेटवर एन्ट्री केली. उंचा पुरा आकर्षक ड्रेस परिधान केलेल्या ईश्वरीवर साऱ्यांच्या नजरा खिळल्या. बऱ्याच दिवसांनी ईश्वरी अवॉर्ड सोहळ्यात पाहायला मिळाल्याने मराठी सेलिब्रिटींनी देखील तिची भेट घेऊन विचारपूस केली. ईश्वरी श्री गुरुदेव दत्त मालिकेच्या सेटवर यायची, तेव्हा कॅमेऱ्या मागचे काम कसे असते याची उत्सुकता तिला होती. मात्र त्यावेळी आपले शिक्षण पूर्ण करण्यावर तिने लक्ष्य केंद्रित केले होते. त्यानंतर ईश्वरीने आता आपल्या निर्मिती संस्थेची धुरा सांभाळावी असे सल्ले प्रेक्षकांकडून देण्यात येत आहेत.
आई निशिगंधा वाड यांच्याकडे शब्दांचा भांडार तर आहेच, शिवाय तिची आज्जी म्हणजेच डॉ विजया वाड याही उत्तम लेखिका आहेत. दीपक देऊकळकर यांनी टेलिव्हिजन वरील कृष्णा मालिकेतील बलरामच्या भूमिकेपासून सुरुवात केली होती. लेक लाडकी या घरची मधील महादेव ठाकूर हि त्यांनी साकारलेली व्यक्तिरेखा खूप गाजली. त्यामुळे संस्कारांचे आणि अभिनयाचे धडे तिला बालपणापासूनच मिळालेले आहेत. अर्थात ईश्वरी अभिनय क्षेत्रात येण्याचा विचार करणार की नाही हे येणारा काळच ठरवेल. परंतु या अवॉर्ड सोहळ्यात मात्र ती आपल्या निखळ सौंदर्याने सगळ्यांचे लक्ष्य नक्कीच वेधून घेताना दिसली आहे.