आदेश बांदेकर गेल्या कित्येक वर्षांपासून मराठी सृष्टीत कार्यरत आहेत. अभिनयासोबतच उत्कृष्ट सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी आजवर अनेक शोमधून समर्थपणे पेललेली आहे. झी मराठीवरील होम मिनिस्टर या शोमधुन गेल्या १८ वर्षांपासून आदेश बांदेकर देशभरातील वहिनींना बोलतं करण्याचे काम करत आहेत. यातूनच त्यांनी राजकारणाची धुरा देखील संभाळलेली पाहायला मिळाली. अभिनय, राजकारण, सिद्धिविनायक मंदिराच्या ट्रस्टचे अध्यक्ष अशा विविध क्षेत्रात ते कार्यरत आहेत. त्यांच्या याच प्रसिद्धीचा फायदा घेत काहीजण लोकांची फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. आदेश बांदेकर यांचा मी नातेवाईक आहे असे सांगून काही जणांशी आर्थिक व्यवहार करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
यासंबंधी कोणाची फसवणूक होत असेल तर त्यांनी सतर्क राहावे. जर अशी कोणाची फसवणुक झाली असेल तर त्याचाशी माझा काहीही संबंध नसेल असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. सोशल मीडियावरून आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर यांनी हा खुलासा केलेला पाहायला मिळतो आहे. सोहम बांदेकर याने म्हटले आहे की, “बांदेकर” हे आडनाव किंवा या आडनावाशी साध्यर्म साधणारे बरेचजण मनोरंजनाबरोबर विविध क्षेत्रात वावरत आहेत. यापैकी कोणाशीही व्यवहार करताना काळजी घ्यावी. माझे नातेवाईक आहे असे सांगून कोणी आपली फसवणूक केल्यास त्याच्याशी आमचा कोणताही संबंध नसेल. आदेश बांदेकर होम मिनिस्टर या शोचे सूत्रसंचालन करतात, मात्र ह्या शोमध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही कधीही कोणाकडे पैसे मागितले नाहीत.
असेही आवाहन ते बऱ्याचदा करताना दिसतात. असे प्रसंग बहुतेकदा घडलेले पाहायला मिळाले असल्या कारणाने त्यांनी सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. याउलट मराठी सृष्टीत अनेक कलाकारांच्या मदतिसाठी ते नेहमीच पुढाकार घेताना पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वी पांडू चित्रपटानिमित्त कुशल बद्रिके यांना होम मिनिस्टर कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी आदेश बांदेकर यांनी माझी मदत केली होती. हे सांगताना कुशल भावुक झालेला पाहायला मिळाला होता. त्यामुळे आदेश बांदेकर कोणाची फसवणूक करणार नाहीत अशी खात्री तमाम प्रेक्षकांना आहे. मात्र काही जण त्यांच्या नावाचा गैरवापर करून फसवणूक करत असल्याने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.