महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलेलं आहे. सध्या या शोने टीव्ही क्षेत्रातून काही काळासाठी ब्रेक घेतला आहे. मात्र असे असले तरी ही सर्व कलाकार मंडळी सध्या परदेश दौऱ्यावर गेली आहेत. गौरव मोरे, दत्तू मोरे, वनिता खरात, प्रियदर्शनी इंदलकर, समीर चौघुले, शिवाली परब, पृथ्वीक प्रताप सह हे कलाकार उत्तर अमिरेकीत दाखल झाली आहेत. तीथे ते महाराष्ट्राची हास्यजत्राचे लाईव्ह शो करत आहेत. ६ ते २३ जुलै या कालावधीत उत्तर अमेरिकेत या शोचे आयोजन करण्यात येणार असल्याचे अगोदर सांगितले होते. नुकताच न्यू जर्सीला एक शो करण्यात आला त्यावेळी कलाकारांना एक अविस्मरणीय अनुभव आला.
यावेळी प्रियदर्शनी इंदलकर हिने महाराष्ट्राची हास्यजत्रेची पुण्याई कामाला आली असे आवर्जून म्हटले आहे. कारण शोला दोन तास उशीर होणार हे माहीत असूनही प्रेक्षक या कलाकारांची आतुरतेने वाट पाहत होते. खरं तर हे या प्रेक्षकांचे कलाकारांवरचे प्रेम आहे. त्यामुळे या कलाकारांचा लाईव्ह शो पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक होते. या अनुभवाबद्दल प्रियदर्शनी इंदलकर म्हणते की, आमची flight cancel झाली. ४ वाजता न्यू जर्सी ला शो होता आणि आम्ही २ वाजेपर्यंत अजून बॉस्टन ला च होतो. हे समजल्यावर लगेच बॉस्टन च्या महाराष्ट्र मंडळाचे लोक airport वर पोचले. आमच्यासाठी by road जाण्याची व्यवस्था करण्यात आली. NJ च्या लोकांना mail पोहोचली की ४ चा शो ७ वाजता सुरु होईल कारण असं असं झालय.
रस्त्यात जेवणासाठी १६ min थाबुंन आम्ही full स्पीड ने ५ तासांच्या drive साठी निघालो. नेमका traffic ने आम्हाला त्रास दिला. गेल्या गेल्या शो सुरु करता यावा म्हणुन आम्ही गाडीतच मेक अप केला. केस आवरले. प्रेक्षकाना zoom call करुन विनंती केली की अजून काही काळ please कळ सोसा, आम्ही पोहोचतच आहोत. त्या दिवशी हास्यजत्रेची पुण्याई कळाली. जवळपास ९०० लोक, sold out show, २ तास आमची वाट पाहत होते आणि टाळ्यांच्या गजरात आमचं स्वागत झालं. खूप लांबून लोक आले होते आणि सगळे थांबले होते. हास्यजत्रेवरचं हे प्रेम पाहुन आम्ही सगळे भारावुन गेलो होतो. आमच्या संपूर्ण टीम ची आठवण काढली. मी नशिबवान आहे की या teamचा भाग आहे. USA Tour मधल्या NJ च्या शो साठी केलेली धावपळ आणि त्यावरचा प्रतिसाद हा कायम आठवणीत राहील.