Breaking News
Home / जरा हटके / ​अक्षया हार्दीकच्या लग्नाचा उडाला बार.. पहा या सेलिब्रिटींनी लावली हजेरी
hardeek joshi akshay deodhar wedding

​अक्षया हार्दीकच्या लग्नाचा उडाला बार.. पहा या सेलिब्रिटींनी लावली हजेरी

गेल्या अनेक दिवसांपासून अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीच्या लग्नाची प्रतीक्षा त्यांच्या चाहत्यांना लागून राहिली होती. आणि आज त्यांची ही प्रतीक्षा परिपूर्ण झालेली दिसली. अक्षया आणि हार्दीच्या लग्नाचा बार आज धुमधडाक्यात उडाला असून लग्न सोहळ्याचे व्हिडीओ आणि खास फोटो प्रेक्षकांच्या समोर आले आहेत. अक्षयाचा लग्नातला लूक कसा असेल याची उत्सुकता अनेकांना होती. लाल रंगाचा पैठणीत नवरीच्या या लूकमध्ये अक्षया अधिकच खुललेली पाहायला मिळते. तर हार्दिक देखील क्रीम कलरच्या कुर्ता धोतीमध्ये नवरदेवाच्या पेहरावात तयार झालेला दिसला. आज अखेर अहा चं लग्न धुमधडाक्यात पार पडलेलं पाहून चाहत्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे.

hardeek joshi akshay deodhar wedding
hardeek joshi akshay deodhar wedding

अक्षया आणि हार्दिकच्या लग्नाची तयारी ही गेल्या दोन महिन्यांपासून सुरू झाली होती. गेल्या काही दिवसांपासून हे दोघे मित्रांच्या नातेवाईकांच्या घरी जाऊन  केळवण साजरे करत होते. अगदी लग्नासाठी कार्यालय कुठलं असावं, लग्नासाठी पेहराव कसा असावा याचा त्यांनी अगोदरच प्लॅन करून ठेवला होता. विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांचे लग्न ज्या ठिकाणी पार पडले त्या ठिकाणाला त्यांनी स्वतः जाऊन भेट दिली. पुण्यातील कर्वेनगर परिसरातील पंडित फार्म हाऊसला त्यांनी भेट दिले तेव्हा हे ठिकाण त्या दोघांच्याही पसंतीस उतरले आणि इथेच लग्न करण्याचे त्यांनी पक्के केले. आज २ डिसेंबर २०२२ रोजी अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांनी आपल्या लग्नाची गाठ बांधली आहे.

hardeek akshaya wedding photos
hardeek akshaya wedding photos

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या ग्रहमख पूजन, मेहेंदी सोहळा, हळद आणि संगीत सोहळ्याची धामधूम पाहून त्यांच्या लग्नाची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांमध्ये शिगेला पोहोचली होती. तिच्या हळद आणि मेहेंदी सोहळ्याला मराठी सेलिब्रिटींनी देखील उपस्थिती लावली होती. मेहेंदीच्या वेळी ऋचा आपटे, विणा जगताप यांनी देखील हातावर मेहेंदी काढून घेतली होती. तसेच हळदीच्या वेळी तुझ्यात जीव रंगला मालिकेतील कलाकार मंडळींनी आवर्जून हजेरी लावलेली दिसली. यात महत्वाचं म्हणजे अक्षयाची मेहेंदी खूपच खास ठरली कारण तिने मेहेंदीने आपल्या हातावर सप्तपदीच्या आणाभाका गिरवल्या होत्या. तर नेलपेंटने नखांवर तिने लग्नाची तारीख लिहिली होती. अक्षया लग्नात जी साडी नेसणार होती त्या साडीचे धागे त्यांनी सगळ्यांकडून विणून घेतले होते.

त्यामुळे त्यांचं हे लग्न सर्वार्थाने नियोजन पूर्ण साजरं झालेलं पाहायला मिळालं. काल १ डिसेंम्बरपासूनच अक्षया आणि हार्दिक च्या लग्नासाठी पंडित फार्म हाऊसमध्ये धामधूम सुरू झाली होती. हळदीच्या सोहळ्यानंतर उशिरा पर्यंत त्यांचा संगीत सोहळा साजरा करण्यात आला यावेळी अक्षया आणि हार्दीकने गाण्यावर ठेका धरला. तर आज सकाळपासूनच लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली. या लग्नाला मराठी सेलिब्रिटी विश्वातील वीणा जगताप, कोमल शेट्ये, अमोल नाईक, तुझ्यात जीव रंगला मालिकेतील बहुतेक कलाकारांनी हजेरी लावली होती.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.