अक्षर कोठारी मराठी सृष्टीतला एक हँडसम नायक म्हणून ओळखला जातो. स्टार प्रवाहवरील स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेतून तो शांतनूची भूमिका साकारत आहे. बंध रेशमाचे या मालिकेतून त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. कमला, चाहूल, काय रे रासकला यातून तो मुख्य भूमिकेत पाहायला मिळाला. स्वाभिमान मालिकेतील त्याच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दाखवले आहे. या भूमिकेमुळे अक्षर अधिक उठावदार दिसू लागला आहे. मात्र या प्रवासात त्याने अनेक अडथळे पार केले आहेत. आयुष्यातील मागील काही वर्ष खूपच कठीण गेले. या काळात पत्नीपासून विभक्त होणे आणि भावाचे आजारपण, यामुळे कित्येक रात्री त्याने जागून काढल्या आहेत.
एका मुलाखतीत अक्षरने याबाबत नुकताच खुलासा केला आहे. वैयक्तिक जीवनातील एका मोठ्या संकटातून जात असताना अभिनेता अक्षर कोठारीसाठी २०१९ हे वर्ष कठीण गेले. त्याचा धाकटा भाऊ आमोद कोठारी याला अतालता हा हृदयासंबंधी विकार होता आणि त्यांची प्रकृती अतिशय गंभीर होती. अतालता हे हृदयाची अनियमित ठोके संबंधित विकार आहे. तो म्हणतो, मी अनेक रात्री झोपू शकलो नाही. माझ्या भावाला काही झाले तर काय होईल याचा विचार करत होतो. हमेशा दिमाग में वही रहता था. पण अभिनेत्याचे आयुष्य असे असते की जिथे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय घडते याची पर्वा न करता, शो चालूच राहिला पाहिजे. अक्षर त्यावेळी त्याच्या टीव्ही मालिकेसाठी व्यस्त असायचा.
त्याला आठवतं की, त्याचा भाऊ गंभीर असताना हॉस्पिटलमध्ये सेल्फीसाठी कर्मचारी धावपळ करत माझ्यासोबत फोटो काढत असत. तेव्हा मला कळले की एखाद्या अभिनेत्याचे वैयक्तिक आयुष्य खूप वेगळे असते. प्रत्येकाला एखाद्या कलाकाराला हसताना पहायचे असते. अर्थात मी माझे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन वेगळे ठेवण्याचा प्रयत्न केला. दिग्दर्शक कट म्हटल्यावर मी ते बंद करण्याचा प्रयत्न करायचो. तो कबूल करतो की त्या टप्प्यात त्याने स्वतःला कायम कामात मग्न ठेवले. त्याचा असा विश्वास आहे की अशा वैयक्तिक संकटांमुळे अभिनेत्याचा अभिनय वाढण्यास मदत होते. माझ्या आयुष्यातील हे सर्व अनुभव मला एक चांगला कलाकार बनण्यास मदत करतात.
प्रत्येक अभिनेत्याला वैयक्तिक आयुष्यातील भावनांमधून जगणे आवश्यक आहे. कोठारी हे उद्योगक्षेत्रात एक दशक जुने आहेत. त्याच्या प्रवासाकडे मागे वळून पाहताना तो म्हणतो, अभिनेता बनणे ही माझी निवड होती. अभिनयाची माझी आवड होती. त्यामुळेच माझ्या कुटुंबाने मला पाठिंबा दिला, मला त्यांना हे समजवायला पाच वर्षे लागली. कारण माझा भाऊ स्पेशल चाइल्ड होता, माझ्या आई वडिलांनी मला नेहमी काहीतरी करायला सांगितले. माझा भाऊ गमावणे आणि माझे कुटुंब आणि मी ज्या सर्व संघर्षातून गेलो हे माझ्यासाठी एक प्रेरक शक्ती बनले आहे.