Breaking News
Home / मराठी तडका / गोरेगाव फिल्मसिटीमधला मालिकेचा सेट जळून खाक.. मालिकेत किशोरी शहाणे, शैलेश दातार, भारती पाटील सह
goregaon filmcity
goregaon filmcity

गोरेगाव फिल्मसिटीमधला मालिकेचा सेट जळून खाक.. मालिकेत किशोरी शहाणे, शैलेश दातार, भारती पाटील सह

चित्रपट, मालिकांचे बरेचसे शूटिंग गोरेगाव फिल्मसिटी मध्ये होत असते. कलाकारांना येण्याजाण्यासाठी सोयीस्कर असल्यामुळे निर्माते देखील आपल्या मालिकांचे शूटिंग या ठिकाणी करत असतात. मराठीसह अनेक हिंदी मालिकांचे दररोजचे शूटिंग गोरेगाव फिल्म सिटीमध्ये पार पडत असते. काल शुक्रवारी इथे एका मालिकेचे शूटिंग चालू असतानाच सेटवर आग लागली. या आगीत काही क्षणातच मालिकेचा सेट संपुर्णपणे जाळून खाक झालेला पाहायला मिळाला. सुदैवाने आगीत कुठलीही जीवित हानी झाली नाही अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. आगीचे कारण अद्याप समोर आलेले नसले तरी आगीचे रौद्र रूप पाहून झालेल्या नुकसानीचा अंदाज लावता येतो.

goregaon filmcity
goregaon filmcity

घटनेबाबत अधिक माहिती अशी मिळते की, गोरेगाव फिल्मसिटी येथे काल संध्याकाळी ४ वाजता ही घटना घडली होती. गुम है किसी के प्यार में या लोकप्रिय मालिकेचे शूटिंग या ठिकाणी पार पडत होते. मालिकेच्या सेटवर कलाकार मंडळी आपले शूटिंग पूर्ण करत असतानाच सेटवर अचानक आग लागली. काही क्षणातच या आगीने मालिकेचा संपूर्ण सेट भक्ष्य बनवला. तसा सेटवरील कलाकारांनी तिथून पळ काढला. ही मालिका हिंदी असली तरी यात अनेक मराठी कलाकार महत्वाच्या भूमिका साकारत आहेत. किशोरी शहाणे , शैलेश दातार, भारती पाटील यांच्या यात महत्वाच्या भूमिका आहेत. तर सिद्धार्थ बोडके, आदिश वैद्य, संजय नार्वेकर, मिलिंद पाठक, पंकज विष्णू, गणेश यादव हेही कलाकार मालिकेत झळकले होते.

ghkkpm serial set
ghkkpm serial set

सेटवर आग लागताच अग्निशमन दलाला फोन लावण्यात आला. एक तासात त्यांनी ही आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत मालिकेचा सेट पूर्णपणे जाळून खाक झाला होता. आग एवढी मोठी होती की परिसरात ही बातमी समजताच अन्य सेटवरच्या कलाकारांनी सुद्धा बाहेर धाव घेतली होती. आगीचे लोट पाहून परिसरात एकच गोंधळ उडाला. दरम्यान आता मालिकेचा सेट जळून खाक झाल्याने पर्यायी सेटची व्यवस्था निर्मात्यांना करावी लागणार आहे. गुम है किसी के प्यार में मालिकेचा मराठीत रिमेक केला आहे. स्टार प्रवाहवरील लग्नाची बेडी ही मालिका याचा रिमेक आहे. जवळपास दोन वर्षांपासून ही हिंदी मालिका प्रेक्षकांची भरभरून दाद मिळवत असल्याने याचा मराठीत रिमेक केला जावा असा विचार पुढे आला.

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.