अभिनेत्री म्हटलं की कुठल्या न कुठल्या कारणावरून नेटकऱ्यांकडून त्यांना ट्रोल केलं जातंच. बहुतेक अभिनेत्री अशा ट्रोलिंगवर मौन सोडतात, तर काही जणी त्या निगेटिव्ह कमेंट्सना इग्नोर करतात. मात्र रसिका सुनीलने चक्क तिचं कमेंट सेक्शनच बंद करून चाहत्यांची तिने बोलती बंद केलेली पाहायला मिळत आहे. त्याला कारणही तसंच काही खास आहे. रसिका सुनील ही माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमुळे प्रकाशझोतात आली होती. या मालिकेतून ती ग्लॅमरस भूमिकेत झळकली होती.
नुकताच पार पडलेल्या उंच माझा झोका २०२३ या झी मराठी वाहिनीच्या पुरस्कार सोहळ्यात रसिका सुनील आणि शिवानी सोनार दोघी प्रथमच निवेदन करताना दिसल्या. काही वेळापूर्वीच रसिकाने तिचे नवीन फोटोशूट करून घेतले. हे ग्लॅमरस फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केलेले पाहायला मिळाले. मरून रंगाच्या ब्लेझरमध्ये तिने हे फोटोशूट केले आहे. तिचे हे हटके फोटोशूट पाहून मात्र नेटकऱ्यांना तिचा संताप आला आहे. काहींनी तिचे हे फोटोशूट अजिबातच आवडले नसल्याचे सांगितले आहे. तर तुला अशा फोटोशूटची गरज नाही असेही अनेकांनी म्हटले आहे. ह्यात तुझा मादकपणा नाही दिसत अशा विरोधी प्रतिक्रिया मिळताच रसिकाने तिचं इंस्टाग्रामवरील कॅमेन्ट सेक्शनच बंद करून टाकलं आहे.
काहींनी तिला या नव्या फोटोशूटवर चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. मात्र काही विरोधी प्रतिक्रिया पाहून अनेकजण तिला आता तशाच स्वरूपाच्या प्रतिक्रिया देत असल्याने तिने कमेंटचा ऑप्शनच बंद करून टाकला आहे. अशा विरोधी प्रतिक्रिया मिळाल्यावर काही प्रमाणात त्या डिलीट करता येतात. मात्र रसिकाला बऱ्याचशा प्रमाणात तशाच निगेटिव्ह कमेंट्स येऊ लागल्याने तिने तिच्या चाहत्यांचीच बोलती बंद करून टाकली आहे. असेच काहीसे अनुभव अभिनेत्री पूजा सावंतला देखील दरवेळी मिळत असतात. तेव्हा पूजा अशा निगेटिव्ह कमेंट्सना इग्नोर करते. तर हेमांगी कवी सारखी अभिनेत्री त्या निगेटिव्ह कमेंटचा थेट समाचारच घेत असते.
पण प्रत्येक ठिकाणी आपली प्रतिक्रिया देत बसण्यापेक्षा ते सेक्शनच बंद ठेवून आपल्याला जे साध्य करायचंय ते रसिकाने केलेलं आहे. नव्या फोटोशूटमधून रसिकाने चाहत्यांचे लक्ष तर वेधून घेतलेच आहे. पण या हटके फोटोशूटमुळे ती आता सेलिब्रिटींकडून चांगलीच पसंती मिळवू लागली आहे.