Breaking News
Home / बॉलिवूड / अरबाज समोर येताच जेनेलियाने.. अरबाज खानचा एटीट्यूड पाहून लोक करतायेत जेनेलियाचं कौतुक
arbaaz khan genelia deshmukh
arbaaz khan genelia deshmukh

अरबाज समोर येताच जेनेलियाने.. अरबाज खानचा एटीट्यूड पाहून लोक करतायेत जेनेलियाचं कौतुक

बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मुलांच्या बर्थडे पार्टीला जेनेलिया आणि रितेश देशमुखच्या मुलांना नेहमी आमंत्रित करण्यात येते. अनेकदा रियान आणि राहील या बॉलिवूड स्टार किड्सच्या बर्थडे पार्ट्या आई वडिलांसोबत अटेंड करताना दिसले आहेत. वेड चित्रपटाच्या प्रमोशन निमित्ताने रितेश व्यस्त असल्याने तो सलमान खानच्या भाचीच्या बर्थडे पार्टीला जाऊ शकला नव्हता. मात्र जेनेलिया आपल्या दोन्ही मुलांना घेऊन त्या पार्टीला गेलेली पाहायला मिळाली. सलमान खानची म्हणजेच त्याची बहीण अर्पिता खान आणि आयुष शर्माची मुलगी अयात शर्मा हिचा बर्थडे साजरा करण्यात आला.

arbaaz khan genelia deshmukh
arbaaz khan genelia deshmukh

सुनील ग्रोव्हर, अंगद बेदी, एकता कपूर, सोहेल खान, करण जोहर आपल्या मुलांना घेऊन या पार्टीत दाखल झाले होते. पार्टीमध्ये अनेक सेलिब्रिटी जवळच असलेल्या मीडियाला पोज देत होते. त्यात जेनेलिया देखील आपल्या मुलांसोबत पार्टी एन्जॉय करताना पाहायला मिळाली. त्यावेळी जेनेलिया आपल्या मुलांना घेऊन मिडियासमोर पोज द्यायला उभी होती. तेवढ्यात अरबाज खान समोरून येताना तिने त्याला पाहिले. अरबाज आपल्याला इग्नोर करतोय हे जेनेलियाला समजले होते. मात्र तरीही तिने स्वतः पुढाकार घेऊन हाताने खुणावत अरबाजची चौकशी केली. पण त्याच क्षणी मीडियाला तो पोज देत असल्याचे पाहून जेनेलिया आपल्या मुलाला घेऊन बाजूला झाली. अरबाज मिडियासमोरून बाजूला जाताच ती पुन्हा आपल्या मुलांना घेऊन कॅमेऱ्यासमोर दाखल झाली.

genelia riyan rahil deshmukh
genelia riyan rahil deshmukh

चेहऱ्यावर तीच स्माईल घेऊन ती आपल्या मुलांसोबत पुन्हा पोज देऊ लागली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. जेनेलियाला इग्नोर करणाऱ्या अरबाजचा हा एटीट्यूड पाहून लोकांनी अरबाजला फटकारले आहे. तर तिथेच जेनेलियाच्या कृत्याचे कौतुकही केले जात आहे. अतिशय शिस्तीत आपल्या चेहऱ्यावर हसू ठेवणारी जेनेलिया आपल्या मुलांवर दिलेल्या संस्कारांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी जेनेलियाची दोन्ही मुलं नेहमीप्रमाणेच हात जोडून मीडियाला पोज देत होती. हे आहेत खरे संस्कार जे जेनेलिया आणि रितेशने आपल्या मुलांना दिले आहेत. असे म्हणत लोकांनी त्यांचं कौतुक करण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वीच रितेशने आपल्या मुलांच्या मिडियासमोर अशा हात जोडून उभे राहण्याबद्दल खुलासा केला होता.

मी माझ्या मुलांना सांगून ठेवलेलं आहे, तुमचे आईबाबा जे काम करतात त्यासाठी लोक तुमचे फोटो काढत असतात. तुम्ही आमची मुलं आहात म्हणून ते तुमचे फोटो काढतात. पण त्यांनी तुमचे फोटो काढावेत असं तुम्ही अजून काहीच केलेलं नाही, तरीही ते तुमचे फोटो काढतात. म्हणून तुम्ही त्यांचे हात जोडून आभार मानायला हवेत. रितेश आणि जेनेलिया हे संस्कारी दाम्पत्य याच गोष्टींमुळे प्रेक्षकांकडून लोकप्रियता मिळवत आहेत. आज त्यांचा अभिनित केलेला, दिग्दर्शित आणि निर्मित केलेला पहिला मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्याला प्रेक्षक नक्कीच चांगला प्रतिसाद देतील अशी आशा सगळ्यांनाच आहे.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.