२००१ सालच्या ब्लॉकबस्टर ठरणाऱ्या ‘गदर एक प्रेम कथा’ या चित्रपटाने संपूर्ण जगाला वेड लावून ठेवलं होतं. या चित्रपटामध्ये बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल हे दोघं मुख्य भूमिकेत होते. दोघेही कलाकारांनी स्वतःच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. अशातच तब्बल २२ वर्षानंतर ‘गदर 2’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सध्या या चित्रपटाचा टीजर रिलीज झाला असून, चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. तब्ब्ल दोन दशकांपूर्वी आलेल्या गदर चित्रपटाचे लाखो प्रेक्षक आजही फॅन आहेत हे विशेष. हॅन्ड पंप उखडून काढण्याचा खास सिन आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.
गदर २ मधील टीजरची सुरूवात “दामाद है वो पाकिस्तान का उसे नारियल दो तिखा लगा! वरना इस बार दहेज मे वो लाहोर ले जायेगा” अशा जबरदस्त वाक्यांनी झालेली आहे. रोमांचकारी टीजर पाहताच प्रेक्षकवर्ग खूप भारावून गेला आहे. कधी एकदाचा चित्रपट प्रदर्शित होऊन तारा सिंग आणि सखिनाला पाहू असं अनेकांना वाटत आहे. ‘गदर एक प्रेम कथा’ या चित्रपटामध्ये दाखवल्याप्रमाणे हिंदुस्थान पाकिस्तान वादातील मधील थरार पुन्हा एकदा पाहायला मिळणार असल्याचं दिसतय. अमिषा पटेल सोबतची धम्माल प्रेमकहाणी चित्रपटाचे विशेष आकर्षण ठरणार आहे. टीजर मध्ये अनेक जण क्रश इंडिया म्हणत जागोजागी पोस्टर लावत आहेत. पाकिस्तान मधील लाहोर शहरातील हा सिन खूपच रोमांचकारी आहे.
तितक्यात तारा सिंग इज बॅक असं म्हणत सनि देओलची धडाकेबाज एन्ट्री दाखवली आहे. येत्या १८ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. गदर चित्रपटाचे दिग्दर्शन अनिल शर्मा यांच असून, कमल मुकुट या चित्रपटाचे निर्माते आहेत. दरम्यान एवढ्या वर्षांचा काळ लोटला तरी सनी देओल २२ वर्ष आधीच्या जमिनीमधून हॅन्ड पंप जमिनीतून उखडून काढणाऱ्या तारासिंग सारखाच कणखर दिसतोय. परंतु अमिषा पटेल ही अभिनेत्री वयस्क झाल्याची दिसत आहे. दरम्यानच्या काळात अमिषाचे वजन खूपच वाढले असल्याने तिचे नवीन कोणतेच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले नाहीत. ‘गदर टू’ या चित्रपटामध्ये नेमकं कोणत्या विषयावर चित्रीकरण असणार आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत हे नक्की.