Breaking News
Home / जरा हटके / तू चाल पुढं मालिकेतील अभिनेत्याची लगीनघाई.. बॅचलर्स पार्टी केली साजरी
dhruv datar wedding
dhruv datar wedding

तू चाल पुढं मालिकेतील अभिनेत्याची लगीनघाई.. बॅचलर्स पार्टी केली साजरी

झी मराठीवरील तू चाल पुढं या मालिकेत सध्या अश्विनी तिच्या वाढलेल्या व्यवसायाच्या व्यापामुळे खूपच बिजी झालेली आहे. यात तिला आता घरच्यांची देखील साथ मिळत आहे. पण ही तारेवरची कसरत करत असताना अश्विनीला वेगवेगळ्या आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. यात महत्वाचं म्हणजे विक्रम मोहिते तिच्या या प्रवासात आडकाठी घालत आहे. हाच विक्रम मोहिते आता लवकरच रिअल लाईफमध्ये लग्नाच्या बेडीत अडकलेला पाहायला मिळणार आहे. विक्रम मोहिते हे पात्र मालिकेत विरोधी भूमिका दर्शवणारे आहे.

dhruv datar akshata tikhe
dhruv datar akshata tikhe

अभिनेता ध्रुव दातारने ही भूमिका साकारली आहे. ध्रुव दातारची ही पहिलीच मराठी मालिका आहे याअगोदर तो मॉडेल म्हणून काम करत होता. यातूनच त्याला अभिनय क्षेत्रात येण्याची संधी मिळाली होती. ध्रुव दातार खऱ्या आयुष्यात लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. १४ मे २०२३ रोजी  अक्षता तिखे सोबत त्याने साखरपुडा केला होता. अक्षता तिखे आणि ध्रुव दोघेही कॉलेज पासूनचे मित्र. दोघांची मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. मे महिन्यात  त्यांनी साखरपुडा केला आणि आता ऑक्टोबर महिन्यात हे दोघेही विवाहबंधनात अडकताना पाहायला मिळणार आहेत. अक्षता तिखे ही नृत्यांगना आहे. तिने भरतनाट्यमचे धडे गिरवलेले असून आता ती कोरिओग्राफर म्हणूनही नाव लौकिक करताना दिसत आहे.

akshata tikhe dhruv datar wedding
akshata tikhe dhruv datar wedding

Meraki नावाने तिचा स्वतःचा डान्स क्लास आहे. वेगवेगळ्या इव्हेंटसाठी ती कोरिओग्राफरचे काम करते. नुकतेच अक्षताने तिच्या मैत्रिणींसोबत बॅचलर्स पार्टी साजरी केली. ब्राईड टू बी असे कॅप्शन देत अक्षताने तिच्या बॅचलर्स पार्टीचे काही क्षण शेअर केले आहेत. तर काही दिवसांपूर्वीच ध्रुवने देखील त्याच्या खास मित्रांसोबत गोवा ट्रिप एन्जॉय केली. सध्या ध्रुव एक शूट निमित्त रायपूरला गेलेला आहे. तिथले काम आटोपून तो पुन्हा पुण्यात परतला आहे. यानंतर आता तो स्वतःच्या लग्नाच्या धामधुमीत बिजी असणार आहे. लवकरच हे दोघे लग्न करणार असल्याने त्यांच्या लग्नाच्या अगोदरच्या विधींना येत्या काही दिवसात सुरुवात झालेली पाहायला मिळेल. मेहेंदी सोहळा, हळदीचा सोहळा आणि त्यानंतर त्यांच्या लग्नाच्या  सोहळ्याचा थाट नेमका कसा असणार याची जास्त उत्सुकता आहे.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.