एक अतिशय दुःखद आणि हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. छत्तीसगडमधील प्रसिद्ध युट्युबर आणि कॉमेडियन देवराज पटेल यांचे अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. देवराज एक कॉमेडी व्हिडिओ शूट करणार होता जिथे तो एका ट्रकला धडकला. ‘दिल से बुरा लगता है’ या प्रसिद्ध डायलॉगने तो संपूर्ण देशात प्रचंड प्रसिद्ध झाला होता. हा संवाद सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. त्याच्या निधनाने दिल से बुरा लगता है म्हणत चाहत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
देवराज हा युट्युबच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांना हसवण्याचे काम करत होता. आपल्या जाडेपणाचा त्याने यामध्ये योग्य तो उपयोग करून घेतला होता, त्याचमुळे लोकांना त्याचे व्हिडीओ खूप आवडत असत. युट्युबवर त्याचे ४ लाख ३८ हजाराहून अधिक फॉलोअर्स होते. सामान्य लोकांच्या प्रश्नांना तो विनोदी रूप द्यायचा त्याची ही कला पाहून अनेकांना खदखदून हसायलाही येत होते. असे सांगितले जाते की देवराज पटेल हा २१ वर्षांचा आहे, बीएच्या शेवटच्या वर्षात तो शिक्षण घेत आल्याचे म्हटले जाते. ऑनलाइनच्या या आभासी दुनियेत कमी काळात प्रसिद्धी मिळवणे खूप अवघड आहे. युट्युब, इन्स्टाग्रामवर प्रसिद्धी मिळाल्यानंतर देवराजला बॉलिवूड चित्रपटात झळकण्याची संधी मिळाली होती.
हिंदी चित्रपटाची छोट्या भूमिकेनेही त्याने बरीचशी प्रसिद्धी मिळवली होती. ढीढोरा या चित्रपटात तो भुवन बाम सोबत अभिनय करताना दिसला. अपघात होण्यापूर्वी देवराज रायपूरमध्ये गेला होता. व्हिडीओ बनवत असतानाच त्याचा अपघात झाला असल्याचे म्हटले जाते. एका विनोदी कलाकाराचा अपघातात असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्याचे चाहते आपल्या भावना व्यक्त करत आहेत. यूट्यूबच्या जगातील एक दिलखुलास व्यक्ती गमावल्याचे सर्वांनी दुःख व्यक्त केले आहे. त्याच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्यासाठी बळ मिळो अशी प्रार्थना त्यांच्याकडून केली जात आहे. कलाकार टीमकडून या हरहुन्नरी मित्र देवराजला “दिल से बुरा लगता है” भावपूर्ण श्रद्धांजली.