झी गौरव मराठी नाट्य व चित्रपट क्षेत्रात गेली २१ वर्षे सिने क्षेत्रातील अभिनेते, अभिनेत्री यांना पुरस्काराच्या माध्यमातून कौतुकाची थाप देत आहे. पुरस्कार सोहळ्या निमित्त सचिन पिळगांवकर, प्रसाद ओक, सई ताम्हणकर, श्रेयस तळपदे, अमृता खानविलकर, विजू माने, कुशल बद्रिके, नागराज मंजुळे तसेच मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर कलावंत उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील जोशी यांनी केले. सोहळ्यात विनोदी अभिनेते जॉनी लिवर यांनी पेन विकत असतात आपल्या आयुष्याला कलाटणी देणारा किस्सा स्टँडअप स्वरूपात मांडला.

त्यावेळी जॉनी लिवर अवघे पंधरा वर्षांचे होते, तेव्हा ते षण्मुखानंद सभागृहाच्या परिसरात बॉल पेन विकत असत. एकदा पेन विकले जात नाहीत म्हणून मिमीक्रीची कसब वापरून लोकांना आकर्षित करत होते. अशावेळी अशोक कुमार, शत्रुघ्न सिन्हा, ओम प्रकाश यांच्या आवाजाची नक्कल करत विनोदी ढंगात पेन विकण्यास सुरु केली. आणि असताना अचानक मुन्सिपाल्टीवाल्यांनी येऊन सर्व सामान गाडीत भरले. आणि बजावले की इथे काय नकला करतोस पाठीमागे षण्मुखानंद आहे तिकडे जाऊन कर. त्याचे हे बोल त्यांनी पुढील ३ वर्षात खरे करून दाखवले आणि त्यांचा पहिला शो षण्मुखानंद सभागृहात झाला. बॉलपेन विकता विकता चित्रपट सृष्टीला लाभलेल्या या महान विनोदी कलाकाराचा किस्सा ऐकून सर्वांनी उभे राहून टाळ्या वाजवल्या.

अचानक तसेच बोलता बोलता ते म्हणाले मी मिमीक्री करायचो, कारण त्यावेळी अस गाणं वगैरे नव्हतं. इतक्यातच निलेश साबळे यांनी कच्चा बदाम या सोशल मीडियावरील चर्चित गाण्याचे उदाहरण देखील दिले. विनोदी अंगाने त्यांनी कच्चा बदाम या गाण्याची नक्कल देखील केली. कच्चा बदाम या गाण्याप्रमाणे थेट बॉल पेन गाण्यावर कॉमेडी स्वरूपात गाणे गायले, अशावेळी सोहळ्यात सर्वजण पोट धरून हसू लागले. एका मुन्सिपाल्टीवाने सांगितलेल्या छोट्याश्या गोष्टीने जॉनी लिवर यांचे आयुष्य बदलून टाकले आणि हा विनोदी अवलिया कलाकार चित्रपट सृष्टीला लाभला हे आपले भाग्य म्हणावे लागेल.