कलाकार मंडळी आणि त्यांचे चित्रपट हे नेहमी चर्चेचा विषय ठरत असतात. मात्र ह्यातून त्यांना अनेकदा ट्रोलही करण्यात येतं. त्यांची एखादी भूमिका अथवा चित्रपट आवडला नाही की विरोधक त्यांना धारेवर धरताना दिसतात. मात्र जेव्हा हा विषय वैयक्तिक पातळीवर अथवा त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचतो, तेव्हा त्या ट्रोलर्सला सामोरे जाणे तेवढेच गरजेचे असते. असाच काहीसा विषय चिन्मय मांडलेकरच्या पत्नीने हाताळला आहे. चिन्मय मांडलेकर गेल्या अनेक वर्षांपासून मराठी सृष्टीत कार्यरत आहे. अनेक दर्जेदार मालिकांसोबत त्याने छत्रपती शिवाजी महाराजांवर देखील चित्रपट केले आहेत. ही भूमिका त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली.
आता तो राजकुमार संतोषी यांच्या गांधी आणि गोडसे या चित्रपटातून गोडसेंची भूमिका साकारत आहे. मात्र या भूमिकेमुळे चिन्मयला ट्रोलर्सचा सामना करावा लागत आहे. अर्थात त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती, तेव्हाही त्याला याच परिस्थितीला सामोरे जावे लागले होते. ट्रोलर्स आता त्याच्या मुलाच्या नावाने त्याला धारेवर धरताना दिसत आहेत. चिन्मयच्या मुलाचे नाव जहांगीर आहे. या नावावरून आता ट्रोलर्सने त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. यावर आता त्याची पत्नी नेहा जोशीने परखड मत व्यक्त केलेलं आहे. नेहा म्हणते की, प्रिय ट्रोलर्स, ह्याचा आता कंटाळा आलाय. किती काळ ‘९ वर्षांच्या मुलाला’ तुम्ही लक्ष्य बनवणार आहात? प्रत्येक वेळी त्याच्या वडिलांचा नवीन चित्रपट रिलीज होण्याच्या वेळी?
जहांगीर रतनजी दादाभाई टाटा हे देशद्रोही नव्हते. या देशासाठी या महापुरुषाने जे काही साध्य केले त्याचा अनेकांना लाभ झाला आहे. आमच्या मुलाचे नाव त्यांच्या नावावर ठेवलेले आहे आणि आम्हाला याचा खूप अभिमान आहे. पण हे सर्व मी कोणाला सांगतेय? त्यांना हे अगोदरपासून माहित नाही का. द्वेषाने आंधळे झालेले लोक काहीही असले तरी फक्त निमित्त शोधतात. संस्कार, संस्कृती नेमके काय असतात? अवघ्या ९ वर्षांच्या निष्पाप मुलाचा उल्लेख ‘कार्टं’ म्हणून करणारे संस्कार असतात! त्याच्या आईबद्दल वाट्टेल ते असभ्य बोलणं म्हणजे संस्कृती जपणं? आम्ही माणुसकी, प्रेम जपणारी माणसं आहोत. माझे संगोपन आणि मूल्ये अशा चेहर्याविरहित हल्ल्यांचा निषेध करतात, हे सहन करण्यास मनाई करतात.
ट्रोल करणारे निषेध करण्याच्याही लायकीचे नसतात.
तेव्हा अशा गोष्टी पूणॅपणे ignore करून त्यांचा अपमान करणंच योग्य ठरेल.