सुपर स्टार विजय चव्हाण यांनी मराठी सृष्टीत विनोदी कलाकार म्हणून स्वतःची छाप सोडली होती. मोरूची मावशी नाटकातील त्यांनी साकारलेली स्त्री व्यक्तिरेखा विशेष कौतुकास्पद ठरली. विजय चव्हाण यांचे अभिनय क्षेत्रात पाऊल पडले ते ओघानेच. नाटकातील एका पात्राच्या गैरहजेरीत त्यांनी काम केले होते. इथूनच आपण या क्षेत्रात काहीतरी करू शकतो अशी जाणीव त्यांना झाली. विजय चव्हाण, विजय कदम आणि त्यांचा मित्र या तिघांनी मिळून ‘रंगतरंग’ नावाची नाट्यसंस्था उभारली होती. पुढे त्यांची ओळख लक्ष्मीकांत बेर्डेशी यांच्याशी झाली. त्यावेळी लक्ष्मीकांत आणि पुरुषोत्तम बेर्डे मिळून टूरटूर हे नाटक करत होते. या नाटकामुळे विजय चव्हाण यांना चित्रपटात अभिनयाची संधी मिळाली.
वहिनीची माया, झपाटलेला, अशी असावी सासू, माहेरची साडी, आली लहर केला कहर, पछाडलेला, जत्रा, भरत आला परत, मुंबईचा डबेवाला, श्रीमंत दामोदर पंत. अशा विविध नाटक चित्रपटातून विजय चव्हाण विरोधी तर कधी विनोदी भूमिकेत पाहायला मिळाले. वरद चव्हाण हा त्यांचा एकुलता एक मुलगा. मराठी सृष्टीत खूप कमी लोकांना माहीत होतं की वरद हा विजय चव्हाण यांचा मुलगा आहे. विजय चव्हाण यांनी वरदला त्याच्या करिअरबाबत अनेक महत्वाचे सल्ले दिले होते. परंतु तुझा हा प्रवास सुरू करताना तू विजय चव्हाण यांचा मुलगा म्हणून नाही तर वरद चव्हाण म्हणूनच सुरू करायचा असं त्यांनी ठणकावून सांगितलं होतं. या प्रवासात येणारं यश आणि अपयश हे सर्वस्वी तुझ्यावर अवलंबून असेल.
मी एक बाप म्हणून सदैव तुझ्या पाठीशी असेन. पण एक सुपरस्टारचा मुलगा म्हणून अजिबात नाही. याच कारणामुळे वरदला कुठल्याही चित्रपट किंवा नाटकातून काम मिळवून द्या म्हणून बोलले नाही. सुरुवातीला या गोष्टीचा वरदला खूप राग आला होता. इंडस्ट्रीत बाबांचं एवढं मोठं नाव असल्याने मला त्यांच्यासारखं जमेल की नाही या प्रश्नांनी वरदला भांबावून सोडलं होतं. मात्र त्यावर विचार केल्यानंतर बाबांचा निर्णय अगदी योग्य आहे हे त्याला पटले. लेक माझी लाडकी, ललित २०५, १०० डेज, अजूनही चांद रात आहे, खो खो, ऑन ड्युटी २४ तास, श्रीमंत दामोदरपंत, धनगरवाडा अशा चित्रपट आणि मालिकांमधून वरद झळकला आहे. बारा वर्षांच्या अभिनय क्षेत्राच्या प्रवासात वरदला त्याच्या सजग अभिनयाची पहिली पोचपावती मिळाली आहे.
नुकतेच कलर्स मराठी वाहिनीचा अवॉर्ड सोहळा संपन्न झाला. यामध्ये वरदला आई मायेचं कवच या मालिकेत साकारलेल्या भास्करच्या भूमिकेला ‘लोकप्रिय सहाय्यक व्यक्तिरेखा’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हा गौरव होताना बाबा हवे होते असे भावुक मेसेज त्याने सोशल मीडियावर व्यक्त केला आहे. पण त्यांनी हा क्षण पहिला असेल ह्याची पूर्ण खात्री वरादला आहे. विराज राजे सर, कोठारे व्हिजन, महेश कोठारे सर, पत्नी प्रज्ञा आणि आई विभावरी. तसेच मालिकेची संपूर्ण टीम, भाग्यश्री चिरमुले, सचिन देशपांडे, प्रचिनी चव्हाण यांचेही मनापासून आभार मानले आहेत. सगळ्यात शेवटचं सर्व रसिक प्रेक्षकांचे आभार मानून असंच प्रेम आणि आशीर्वाद कायम असू दे असे आवाहन केले आहे.