प्रसंग कुठलाही असो कलाकाराला त्याची कामाप्रति असलेली निष्ठा दाखवावीच लागते. अगदी प्रशांत दामले यांचे नाटकाचे दौरे असतानाही त्यांना वडिलांचे अंत्यसंस्कार आटोपून लगेचच प्रयोगाला जावे लागले होते. आपल्यामुळे समोरच्याचा खोळंबा होऊन नये तसेच प्रेक्षक नाराज होऊ नयेत हीच त्यामागची एक इच्छा होती. त्या घटनेनंतर प्रशांत दामले काळजावर दगड ठेवून शो मस्ट गो ऑन म्हणत नाटकाच्या दौऱ्याला निघाले होते. त्यांच्याच नाटकातील असा अनुभव अतुल तोडणकर यांना आला आहे. एका लग्नाची पुढची गोष्ट हे या नाटकाच्या निमित्ताने ही टीम अमेरिकेत गेली होती.
नाटकाचे दौरे आता पूर्ण झाले आहेत पण या प्रयोगा दरम्यान अतुल तोडणकर यांना इन्फेक्शन झाले. हा त्रास एवढा भयंकर होता की त्यांचा चेहरा आणि डोळ्याला पूर्णपणे सूज आली होती. पण रसिक प्रेक्षकांच्यास प्रतिसादामुळे अतुल तोडणकर हे आपल्याला होणाऱ्या त्रासाबद्दल विसरून गेले. अशा परिस्थितीतही शो मस्ट गो ऑन म्हणत रसिक प्रेक्षकांसाठी त्यांनी नाटकाचे प्रयोग सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. चेहऱ्यावर आलेली ही सूज अतुल तोडणकर यांनी फोटोंद्वारे सोशल मीडियावर शेअर केली आहे. खरं तर त्यांच्या चेहऱ्यावरची ती सूज पाहून सेलिब्रिटिनी देखील त्याच्या या डेडिकेशनचे कौतुक केले आहे. या अनुभवाबद्दल अतुल तोडणकर यांनी एक पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आज एका लग्नाची पुढची गोष्ट या आमच्या नाटकाचा दुसरा अमेरिका दौरा संपला. खूप संमिश्र आठवणी.
माझा हा अमेरिकाचा तिसरा दौरा, मोठेपणा मिरवत नाहीय. म्हणजे तशी इथल्या वातावरणाची सवय आणि अंदाज आलाय. पण या वेळेस गंम्मत केली अमेरिकेने. हाऊसफ़ुल्ल शो चालू होते. शिकागो, सेंट लुईस आणि डॅल्लस चा शो झाल्यावर मला शिंगल्स चा त्रास झाला. म्हणतात की कांजन्याची वायरल इन्फेक्शन. अर्धा चेहरा आणि डोळा सुजला होता. पण अमेरिकेचे दर्दी रसिक प्रेक्षक, त्यांचा तुफान प्रतिसाद, आमची नाटकाची टीम आणि आमचा जादूगार प्रशांत दामले यांच्यासमवेत. त्या प्रत्येक तीन तासात काहीतरी घडायचं आणि प्रयोग पार पडायचा. आज आमची दौऱ्याची सांगता झालीय आणि मी पूर्ववत होतो तसा झालोय. हीच तर नाटकाची गंम्मत आहे मित्रांनो. या दोन्हीही वीकएंड ला प्रत्येक सेंटरला निष्णात डॉक्टर तैनात होते, ट्रीटमेंट उत्तम चालू होती. प्रशांत सर, आऊ, कविता आणि माझ्या संपूर्ण टीमचा मी ऋणी आहे. अजय वसुधा निहार पटवर्धन अतुल करणॆ, राहुल कुलकर्णी सर्वांना खूप खूप प्रेम.