कलाकारांच्या आयुष्यात अनेक धमाल गोष्टी घडत असतात. नाटकांच्या किंवा चित्रपटाच्या शूटिंगवेळी दौऱ्यावर असताना हे कलाकार एकमेकांसोबत बराचसा वेळ घालवतात. याच गमतीजमती सांगायला आज अतुल परचुरे झी मराठी वाहिनीच्या हे तर काहीच नाय या शोमध्ये दाखल झाला आहे. अतुल परचुरे यांच्यासोबत अदिती सारंगधर, संजय मोने, मेघा घाडगे, संदीप देशपांडे या कलाकारांनी आणि राजकीय व्यक्तीने देखील या मंचावर उपस्थिती दर्शवली आहे. दरम्यान अतुल परचुरे यांनी संजय नार्वेकर यांच्यासोबतच्या अनेक गमतीजमती मंचावरून शेअर केल्या आहेत. संजय नार्वेकर आणि अतुल परचुरे कामानिमित्त दौऱ्यावर होते.

सकाळी आपण झोपेतून उठतो आणि उठल्यावर सकाळची आपली कामे आटोपतो. आणि मगच दुसऱ्यांशी बोलायला जातो. तर संजय नार्वेकर सकाळी उठल्यावर पहिल्यांदा मला मिठी मारायला धावायचा, मग मी धावायचो आणि तो माझ्या पाठीमागे धावायचा. अशी आमची रोजची धावाधाव चालू असायची. मी मुंबईला असताना स्कूटर वर बऱ्याचदा फिरलोय. माझ्यासोबत संजय नार्वेकर देखील असायचा. एकदा हाजी अली वरून जात असताना, भर ट्रॅफिकमध्ये संजय नार्वेरकरने माझे डोळे बंद केले होते. आणि म्हणाला आता चालवून दाखव, मी कशी चालवणार होतो? बरं तो स्वता माझ्या मागे बसला होता, असे मी संजय नार्वेरकरसोबत दिवस काढलेले आहेत आणि मला फार आनंद आहे.

संजय सोबतच्या आठवणी त्यांनी जाग्या केलेल्या पाहायला मिळाल्या. अतुल यांनी डाएट फॉलो करावे म्हणून एक खास गोष्ट त्यांना भेट म्हणून देण्यात आली. जी गोष्ट तुम्ही खाऊन आनंद घेऊ शकता पण ती पोटात जाणार नाही. असे म्हणत महेश जाधवने अतुल यांना चुईंगम गिफ्ट केले. ही गोष्ट तुम्ही खाऊन आनंद घेऊ शकता याची पुरेपूर काळजी मात्र शोने घेतली. आजच्या भागात अदिती सारंगधर तिच्या लग्नानंतर नवऱ्यासोबत घडलेला एक धमाल किस्सा शेअर करताना दिसणार आहे. हनिमूनला जाताना भरगच्च बॅगांनी त्यांच्यात पाहिल्यादा भांडण कसे जुंपले याचा हा किस्सा असणार आहे. तर संजय मोने, मेघा घाडगे, संदीप देशपांडे कुठले धमाल किस्से ऐकवणार आहेत. याची देखील उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.