Breaking News
Home / मराठी तडका / नानांचे स्वप्न म्हणत आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेत्रीने खरेदी केली पहिली वहिली गाडी
ashvini mahangade aai kuthe kay karte
ashvini mahangade aai kuthe kay karte

नानांचे स्वप्न म्हणत आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेत्रीने खरेदी केली पहिली वहिली गाडी

चंदेरी दुनियेत पाऊल टाकल्यानंतर कलाकार मंडळी आपल्या स्वप्नांचा पाठलाग करतात. स्वप्नं सत्यात कशी उतरतील याचा पाठपुरावा ते सतत करत राहतात. अशीच स्वप्न उराशी घेऊन आलेल्या अभिनेत्रीचे खूप दिवसांचे स्वप्न सत्यात उतरले आहे. अशी कुठे काय करते, स्वराज्यरक्षक संभाजी मालिकांनी लोकप्रियता मिळवून दिलेली अभिनेत्री म्हणजे अश्विनी महांगडे. अश्विनीच्या बाबांचं म्हणजेच नानांच एक स्वप्न मी पूर्ण करतीये असे म्हणत, आज स्वकष्टाने खरेदी केलेल्या पहिल्या वहिल्या गाडीची झलक दाखवली आहे. सरत्या वर्षाला निरोप देताना गाडी खरेदी करत अश्विनीने आपला आनंद द्विगुणित केला आहे.

ashvini mahangade aai kuthe kay karte
ashvini mahangade aai kuthe kay karte

कष्ट करत रहा त्याची परतफेड तुम्हाला नक्कीच मिळेल या विश्वासावर आणि मेहनतीच्या जोरावर तिने पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरलं आहे. या आनंदाच्या क्षणी अश्विनीच्या चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. तिने खरेदी केलेल्या महिंद्रा या भारतीय बनावटीच्या एक्सयूव्ही गाडीची किंमत १२ लाख रुपये एवढी आहे. आज इतक्या वर्षांच्या मेहनतीनंतर आपली स्वप्नं पूर्ण होताना पाहून अश्विनीचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आई कुठे काय करते मालिकेतून अश्विनी अनघाचे पात्र साकारत आहे. अश्विनीला या भूमिकेमुळे चांगली लोकप्रियता मिळाली आहे. याअगोदर स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतून तिने रानुअक्काचे पात्र गाजवले होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या बहिणीचे पात्र अश्विनीने तिच्या दमदार अभिनयाने चांगलेच गाजवले होते.

ashvini mahangade dream comes true
ashvini mahangade dream comes true

अश्विनी या ऐतिहासिक भूमिकेमुळे प्रकाशझोतात आली होती. आई कुठे काय करते मालिकेतील तिचे अनघाचे पात्र देखील तेवढेच दमदार आहे. झी मराठीवरील अस्मिता ही तिची पहिली मालिका, यात डिटेक्टिव्हचे पात्र साकारले होते. मोजक्याच मालिका करून लोकप्रियता मिळवत असतानाच तिने सामाजिक बांधिलकी देखील जपली आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक चढ उतार कायम येत राहतात. साधारण वर्षापूर्वी तिच्या वडिलांचे निधन झाले, तेव्हा ती खूपच खचून गेली होती. मात्र स्वतःला कामात गुंतवून ठेवायचं ही त्यांची शिकवण मला डिप्रेशन पासून बाजूला घेऊन गेली असे ती म्हणते. कामचं ठिकाण हे आपलं घर समजूनच ती आपला वेळ मजेत घालवण्याचा प्रयत्न करते.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.