अशोक शिंदे यांच्या रूपाने मराठी सृष्टीला एक देखणा नायक लाभला. आज इतकी वर्षे मराठी इंडस्ट्रीत काम केल्यानंतरही त्यांचे तारुण्य, चेहऱ्यावरचे तेज टिकून आहे. त्यामुळे अशोक शिंदे यांना चिरतरुण अभिनेते अशी ओळख मिळाली. अशोक शिंदे यांचे वडील मेकअप आर्टिस्ट होते. आपल्या मुलाने अभिनय क्षेत्रात जाऊ नये कारण हे क्षेत्र बेभरवशाचे आहे, हे त्यानी अगोदरच सांगून ठेवले होते. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना अशोक शिंदे यांना अभिनयाची ओढ लागली, मात्र म्हणावी तशी संधी मिळत नव्हती. कॉलेजचे शिक्षण झाल्यानंतर अशोक शिंदे आपल्या वडिलांप्रमाणे मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करू लागले.
एकदा नाटकासाठी कलाकारांना रंग चढवताना राम कदम यांनी त्यांच्याकडे पाहिले. मला तुझ्यात शाहीर पठ्ठेबापूराव यांची झलक दिसतेय. तूच ती भूमिका करणार असे त्यांनी अशोक शिंदे यांना सांगितले. त्याच दिवशी अशोक शिंदे यांच्या मोठ्या मुलीचा जन्म झाला होता. त्यामुळे अशोक शिंदे यांनी त्यादिवशी दुहेरी आनंद साजरा केला. या चित्रपटा बरोबरच त्यांना आणखी एका चित्रपटाची ऑफर मिळाली. मेकअप आर्टिस्ट ते चित्रपटाचा नायक अशी मजल मारत त्यांनी चित्रपट, मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. नेहा आणि योजना या त्यांच्या दोन लाडक्या कन्या आहेत. मुलींच्या संगोपणात त्यांनी कधीच आडकाठी आणली नाही. आपले करिअर निवडायचेही स्वातंत्र्य त्यांना दिले होते. मुलींना करिअरमध्ये वडिलांचे नाव वापरायचे नाही अशी सक्त ताकीद त्यांनी दिली होती.
आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र निर्भर असलेल्या त्यांच्या मुली आज आपापल्या क्षेत्रात नाव कमवत आहेत. नेहाने एमबीएचे शिक्षण घेतल्या त्यानंतर ती बॉलिवूड मध्ये काम करू लागली. अक्षय कुमारची हरिओम कंपनी तसेच टिप्ससाठी तीने गाणी निर्मित केली आहेत. दुसरी मुलगी योजना हिने हाईप कॅसल या नावाने स्वताचा कपड्यांचा ब्रँड सुरू केला. मुलींनी स्वबळावर करिअर घडवल्याने त्यांचा अभिमान अशोक शिंदे यांना आहे. आपल्या लेकींनी स्वबळावर करिअर घडवल्याने त्यांचा अभिमान असल्याचा अशोक म्हणतात. कलाकारांची मुलं साहजिकच अभिनय क्षेत्राकडे आकर्षित होतात, हा समज मराठी सृष्टीत तरी तुरळक पहायला मिळतो. वडिलांप्रमाणे आपल्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणाऱ्या अशोक शिंदे यांच्या मुलींचंही नक्कीच कौतुक करायला हवं.