Breaking News
Home / बॉलिवूड / अनुपमा मालिकेतील प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री, गेल्या १८ वर्षांपासून लीव्हइन रिलेशनमध्ये
ashlesha savant
ashlesha savant

अनुपमा मालिकेतील प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री, गेल्या १८ वर्षांपासून लीव्हइन रिलेशनमध्ये

मराठी अभिनेत्रींनी हिंदी मालिका सृष्टीत देखील स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आई कुठे काय करते ही मराठी सृष्टीतील नंबर एकची मालिका ठरली आहे. तर या मालिकेचा सिक्वल असलेली अनुपमा ही हिंदी मालिका देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. अनुपमा मालिकेत अनेक मराठी कलाकार झळकले आहेत. अगदी सविता प्रभुणे, दिवंगत अभिनेत्री माधवी गोगटे, अनघा भोसले यांनी या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारलेल्या पाहायला मिळाल्या. अनघाने अभिनय क्षेत्रातून काढता पाय घेऊन अध्यात्मिकतेचा मार्ग स्वीकारला. या मालिकेत आणखी एक महत्वाचे पात्र मराठमोळ्या अभिनेत्रीने साकारले, त्या अभिनेत्रीचे नाव आहे आश्लेषा सावंत.

ashlesha savant
ashlesha savant

आश्लेषा सावंत अनुपमा मालिकेतून बरखा कपाडियाचे पात्र निभावत आहे. आश्लेषाचे वडील एअरफोर्समध्ये असल्याने तिचे शिक्षण पुण्यातच झाले. कॉलेजमध्ये असतानाच आश्लेषाला मॉडेलिंगचे वेध लागले होते. त्यादृष्टीने तिने मुंबईच्या दिशेने आपली पाऊले वळवली. इथूनच तिचा चंदेरी दुनियेतला प्रवास खऱ्या अर्थाने सुरु झाला. क्यूँकी सांस भी कभी बहु थी या मालिकेने तिला मोठा ब्रेक मिळवून दिला. यात तिने तिशा मेहताची भूमिका साकारली होती. या मालिकेनंतर आश्लेषाने मागे वळून पाहिलेच नाही. कसौटी जिंदगी की, कहीं तो होगा, देस में निकला होगा चांद, ची अँड मी, सात फेरे, कैसा ये प्यार है. पवित्र रिश्ता, कुमकूम भाग्य, उडाण, अलिफ लैला, अनुपमा अशा एकामागून एक येणाऱ्या मालिकेतून आश्लेषाला चांगली लोकप्रियता मिळाली.

ashlesha savant sandeep baswana
ashlesha savant sandeep baswana

चंदेरी दुनियेतल्या या प्रवासात तिने आपला जोडीदार देखील निवडला. आश्लेषा सावंत आणि अभिनेता संदीप बसवाना हे दोघे गेल्या १८ वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनमध्ये आहेत. या दोघांनी क्यूँकी सांस भी कभी बहु थी या मालिकेतून एकत्रित काम केले होते. मात्र हे दोघेही दिर भावजयच्या भूमिकेत झळकले होते. मालिकेमुळेच या दोघांची चांगली ओळख झाली. लग्न न करता हे दोघेही गेले दोन दशक एकमेकांना साथ देत आहेत. आपल्या नात्याबद्दल हे दोघेही खूप खुश आहे. सुरुवातीला आश्लेषा या नात्याबद्दल साशंक होती. मात्र सुखी राहण्यासाठी आम्हाला कुठल्या कागदाची गरज वाटत नाही असे स्पष्टीकरण तिने याबाबत दिले आहे. आश्लेषा जेव्हा माझ्या घरी पहिल्यांदा आली तेव्हा ती आमच्या घरातलीच कायमची सदस्य बनली.

आम्ही एकमेकांसोबत खूप सुखी आहोत आणि आम्हाला जेव्हा मूल हवं असेल तेव्हा आम्ही नक्कीच लग्न करू असेही या दोघांनी मीडियाशी बोलताना म्हटले आहे. अश्लेषाच्या वाढदिवशी भावना व्यक्त करताना संदीप म्हणतो कि, मला तुझ्याबद्दल बोलताना खरं तर शब्द तोडके पडत आहेत. एक लाजाळूमुलगी ते प्रतिभावंत कलाकार पर्यंतचा तुझा प्रवास वाखाणण्याजोगा आहे. अगदी तुझ्या चुकांमधूनही मला खूप काही शिकण्यासारखे आहे. मी तुझा हात धरून तुला जग दाखवणार होतो, पण तुझ्या पावलावर पाऊल ठेवण्याचं माझ्या नशिबात आहे हे मला माहीत होतं! आपल्या प्रेमा व्यक्तरिक्त या जगात दुसरे सुंदर काहीच नाही हे मला शिकवल्याबद्दल धन्यवाद, लव्ह यू हनी बनी. माझ्या प्रिये तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.