गेल्या काही दिवसांपूर्वी बालाजी मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो, मूर्ती असलेले वाहन प्रवेशाला बंदी घातली होती. त्यावरून एक वाद निर्माण झाला होता. हा वाद संस्थान आणि राजकारण्यांच्या हस्तक्षेप आणि मध्यस्तीमुळे मिटवला गेला. तरी या संस्थानातील कर्मचाऱ्यांविरोधात अभिनेत्रीने नुकताच एक आरोप लावलेला पाहायला मिळतो आहे. अर्चना गौतम ही बॉलिवूड, तामिळ तसेच तेलगू चित्रपट अभिनेत्री आहे. तिने मिस उत्तर प्रदेश, मिस बिकिनी इंडिया, मिस टॅलेंट अशा सौंदर्य स्पर्धा जिंकलेल्या आहेत. ग्रेट ग्रँड मस्ती, हसीना पारकर सारख्या चित्रपटातून तिने अभिनय केला आहे. काही दिवसांपूर्वीच अर्चना गौतम आपल्या मित्रांसोबत बालाजीच्या दर्शनाला गेली होती.
मात्र तिथल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या सोबत गैरवर्तवणूक केला असल्याचा आरोप लावला आहे. याशिवाय कर्मचाऱ्यानी देव दर्शनासाठी दहा हजार रुपयांची मागणी केली असल्याचा आरोप तिने त्यांच्यावर लावला आहे. सोशल मीडियावरून अर्चनाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. आणि आपल्या विरोधात कर्मचाऱ्यांनी गैरवर्तवणूक केली असल्याचा संताप व्यक्त केला. तिचा हा व्हिडीओ मीडिया माध्यमातून जोरदार व्हायरल झाला आहे. मात्र या आरोपावर संस्थानातील कर्मचाऱ्यांनी नुकतेच उत्तर दिले आहे. कर्मचाऱ्यांचे म्हणणे होते की, ३१ ऑगस्ट २०२२ रोजी अर्चना आपल्या मित्रांसोबत बालाजीच्या दर्शनासाठी आली होती. तिच्यासोबत शिवकांत तिवारी देखील होते. केंद्रीय सहाय्यक मंत्र्याचे शिफारस पत्र घेऊन हे सगळे देवदर्शनासाठी आले होते.
या लोकांनी अपर ईओ कार्यालय दर्शनासाठी निवेदन दिले. या पत्रावरून संस्थांकडून ३०० रुपयांचे दर्शन तिकीट देण्यात येईल असा मेसेज शिवकांत तिवारीच्या मोबाईलवर मिळाला. परंतु त्यांनी पुढील सूचनांचे पालन केले नाही. आणि तिकीट खरेदी करण्याची वेळ संपून गेल्यावर पुन्हा अपर ईओ कार्यालयाला भेट दिली. तेव्हा अर्चनाने तिथे येऊन कर्मचाऱ्यांशी वाद घातला. शिवकांत तिवारी यावेळी गप्प बसून होते, त्यांनी अर्चनाला समजावण्याचा प्रयत्न केला नाही. हे प्रकरण शांत झाल्यानंतर अर्चनाला पुन्हा ३०० रुपयांचे तिकीट खरेदी करण्यास सांगितले, पण यावेळी तिने नकार दिला. आणि थेट नजीकच्या पोलीस ठाण्यात जाऊन कर्मचाऱ्यां विरोधात तक्रार दाखल करण्याची तयारी दर्शवली.
उलट अर्चनानेच गैरव्यवहार केल्याचा एक व्हिडिओ या कर्मचाऱ्यानी प्रसिद्ध केला. त्यावेळी सगळी चूक अर्चनाची असल्याचे आढळून आले. मंदिर प्रशासनाने याबाबत खुलासा करताना म्हटले की, आमच्या स्टाफने अर्चनाला कुठल्याही अधिक रकमेची मागणी केली नव्हती. फक्त १ सप्टेंबरसाठी व्हीआयपी दर्शन तिकीट पाहिजे असेल तर तिकिटाचे १०५०० रुपये द्यावे लागतील असे कळवले. परंतु अर्चनाने याचा वेगळाच अर्थ लावला, असे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिलेले पाहायला मिळाले.